महापालिका निवडणुकीत मनसेचा 'भोंगा' वाजणार का ?

एकट्याने लढण्याची शक्यता लक्षात घेऊन `मनसे`ची तयारी सुरु आहे. युती झाली नाही,तर सर्व १३९ जागा ते लढणार आहेत.
महापालिका निवडणुकीत मनसेचा 'भोंगा' वाजणार का ?
pcmc sarkarnama

पिंपरी : आगामी महापालिका निवडणूक (Pimpri Chinchwad Municipal Corporation Election) एकत्र लढण्याचे महाविकास आघाडीचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. दुसरीकडे भाजप स्वबळाच्या तयारीत आहे. तर, त्यांच्याशी युती होण्याची मनसेला (MNS)आशा वाटते आहे. मात्र, ती होवो अथवा न होवो एकाचे दोन आकडी नगरसेवक यावेळी होणार असल्याचा दावा 'मनसे'चे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष सचिन चिखले (Sachin Chitale) यांनी 'सरकारनामा'शी बोलताना आज केला.त्यासाठी भोंग्याचा निश्चीत फायदा होईल,असे ते म्हणाले.

युती करायची की नाही हा निर्णय पक्षप्रमुख राज ठाकरे घेणार आहेत. मात्र, तो अद्याप झालेला नाही. कारण कार्यकर्त्यांना तसे कळविण्यात आलेले नाही, असे चिखले यांनी सांगितले. भाजपशी युती होण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. ती झाली, तर फायदा निश्चीत होईल. तसेच नाही झाली, तरी फायदाच आहे. कारण पक्षाने प्रभाग स्तरापर्यंत जोरदार तयारी सुरु केली आहे.

pcmc
मुख्यमंत्र्यांच्या 'नवीन' टीममध्ये पाच महिलांचा समावेश, १२ नवीन चेहऱ्यांना संधी

उद्याही गणेश सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात प्रभागनिहाय बैठका होणार आहेत,अशी माहिती त्यांनी दिली. गतवेळी शहरात १२८ मध्ये फक्त एक नगरसेवक `मनसे`चा होता. यावेळी दोन आकडी नगरसेवक होतील,असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी भोंग्याचा फायदा होणार आहे, असे ते म्हणाले.

युतीची वा एकट्याने लढण्याची शक्यता लक्षात घेऊन `मनसे`ची तयारी सुरु आहे. युती झाली नाही,तर सर्व १३९ जागा ते लढणार आहेत.त्यातील ८० उमेदवार फायनल झाले असल्याची माहिती चिखले यांनी दिली. सध्याची राजकीय स्थिती व मनसेचे पाचवरून एकावर आलेली नगरसेवकांची संख्या आणि त्यांची कमी झालेली क्रेझ पाहता भाजपशी युती झाली, तर त्यांना फायदा होईल,असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे शहर भाजप मनसेशी युती करण्यास तेवढी उत्सुक नाही. तशी चर्चाही त्यांनी सुरु केलेली नाही वा ती करण्याच्या मनस्थितीतही नाहीत. त्यांचे एकच लक्ष्य राष्ट्रवादी कॉंग्रेस असून त्यांच्याशी भिडण्यात आणि पालिकेची सत्ता पुन्हा एकहाती मिळविण्याची त्यांच्या शहर कारभाऱ्यांची व्यूहरचना सध्या सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in