अभी नहीं तो कभी नहीं! राज ठाकरेंची पुण्यातील सभा 'वादळी' ठरणार; टीझर आला...

राज ठाकरे यांची 22 मे रोजी पुण्यात सभा होणार आहे.
MNS Raj Thackeray Latest Marathi News
MNS Raj Thackeray Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथील सभा वादग्रस्त ठरली होती. या सभेनंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. त्यानंतर आता पुण्यातील सभाही वादळी ठरण्याची शक्यता आहे. या सभेचा टीझर पक्षाकडून रिलीज करण्यात आला आहे. (Raj Thackeray Latest Marathi News)

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावरुन राजकारण चांगलंच तापायला लागले होते. राज ठाकरे येत्या पाच जूनला अयोद्धेला जाणार होते. काही कारणामुळे राज ठाकरे यांचा हा दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी याबाबत टि्वट करून माहिती दिली आहे. (Raj Thackeray Pune rally teaser)

MNS Raj Thackeray Latest Marathi News
MNS : राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित

पुण्यातील सभा मात्र होणार असून मनसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राज यांनी ट्वीटमध्ये केले आहे. ही सभा गणेश कला क्रीडा मंच येथे 22 मे रोजी सकाळी दहा वाजता आहे. या सभेचा टीझर शुक्रवारी रिलीज करण्यात आला आहे. त्यामध्ये राज ठाकरें काय बोलणार, याची झलक पाहायला मिळते.

'सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊनच जाऊ दे', अशी टीझरची सुरूवात आहे. त्यानंतर अभी नहीं तो कभी नहीं, हे राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेतील भाषणातील वाक्यही त्यामध्ये आहे. त्यावरून आता राज ठाकरेंची तोफ पुण्यातही धडाडणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.

प्रामुख्याने औरंगाबाद येथील औरंगजेबाच्या समाधीचा मुद्दा त्यांच्याकडून प्रखरपणे मांडला जाऊ शकतो. बुडाला औरांग्या पापी, म्लेंच्छसंव्हार जाहाला, मोडलीं मांडली छेत्रें, आनंदवनभुवनीं! असंही टीझरमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशचे भाजप खासदार ब्रजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी जोरदार विरोध केला होता. राज ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी त्यानंतरच अयोध्येत पाय ठेवावा अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com