"...तर मनसेचे मत शिवसेनेला गेले असते" : राजू पाटील यांचे मोठे विधान

MNS | Rajya Sabha | Shivsena : मनसेच्या विधानाने भाजपचे टेन्शन वाढले?
Raju Patil News, Raj Thackeray News
Raju Patil News, Raj Thackeray NewsSarkarnama

डोंबिवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपले एकमेव मत राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपला देण्याबाबत सहमती दर्शविली आहे, मात्र अद्याप याबाबत मनसेकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यातच आज मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी जर काही जणांनी इगो बाजूला ठेवून राज साहेबांशी चर्चा केली असती तर साहेबांनी तो विचारही केला असता, परंतु काही लोक केवळ एमआयएम (MIM) आणि अबू आझमी (Abu Aazami) यांची मत गोळा करण्यात बिझी असल्याने त्यांनी विचार केला नसेल असे म्हणतं चर्चा झाली असती तर मनसेचे मत शिवसेनेलाही गेले असते अशा शक्यता बोलून दाखविल्या. (Raju Patil News)

आमदार राजू पाटील यांनी आज दिवा शहरातील प्रश्नांबाबत ठाणे महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. पाटील यांना पत्रकारांनी राज ठाकरे-आशिष शेलार भेटीवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, राज साहेब आणि आशिष शेलार हे मित्र आहेत. त्यांनी विनंती केली की तुमचा पाठिंबा तुम्ही भाजपाला देणार का? त्यावर राज साहेबांनी त्यांना सकारात्मकता दाखवली आहे. शेलार यांनी विनंती केली त्यांना मान दिला. बाकी कोणी विनंती केलीच नसेल तर विषय येतोच कुठे?

मागील वेळेस संभाजीराजे छत्रपतींनी विनंती केली होती. त्यानंतर त्यांच्या उमेदवारी अर्जावर मनसेने स्वाक्षरी केली होती. या विषयावर काही जणांनी इगो बाजूला सारून विचारलं असत तर पक्षाध्यक्षांनी तोही विचार केला असता. परंतु ती लोक केवळ एमआयएम आणि अबू आझमींच्या मागे व्यस्त असल्याने कदाचित त्यांनी विचार केला नसेल. भाजपाच्या नेत्यांनी ते केलं आहे. मात्र मत देण्याच्या आधी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करून विचारणार असून, ते जसे निर्देश देतील त्याप्रमाणे मत देणार आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज हे आमदार पाटील यांना काय निर्देश देतात आणि आमदार कोणला मतदान करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com