Rohit Pawar : राज ठाकरेंच्या भूमिकेचं पवारांकडून स्वागत ; त्र्यंबकेश्वर मुद्यावरुन रोहित पवार म्हणाले..

Rohit Pawar on raj thackerays : राज ठाकरे आता सत्याच्या बाजूने..
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

Rohit Pawar on raj thackerays : गोदावरी नदीच्या काठावरील त्र्यंबकेश्वर मंदिरात काही दिवसापूर्वी दुसऱ्या धर्माच्या गटाने प्रवेश करून धूप,आरती आणि फुले वाहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्र्यंबकेश्वरमध्ये वादाला तोंड फुटले आहे. त्याला राजकीय रंगही चढू लागला आहे. या वादावरुन अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. (Rohit Pawar on raj thackerays statement trimbakeshwar issue)

राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते, आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरे यांनी या विषयावर दिलेल्या प्रतिक्रियेवर भाष्य केलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

महाराष्ट्रातील सांस्कृतिक वर्तुळात पेच निर्माण करणाऱ्या नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारात सुरु असलेल्या वर्षानुवर्षांच्या परंपरेवरुन सुरु झालेल्या वादावर राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारात वर्षानुवर्षे जी परंपरा सुरु आहे ती थांबविण्यात काही अर्थ नाही,"

"महाराष्ट्रात अशी अनेक मंदिरं-मशिदी आहेत कि जिथे वर्षानुवर्षे हिंदू-मुसलमान एकोपा आढळून येतो. माहीमच्या मगदूम बाबाच्या दर्ग्यावर उरूसावेळी तिथे जी चादर चढवली जाते ती माहीम पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल चढवतो. इतर धर्माचा कुणी माणूस आपल्या धर्मात किंवा धर्मकार्यात आला तर लगेच धर्मभ्रष्ट व्हायला हिंदू हा इतका कमकुवत धर्म आहे का?" असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

Raj Thackeray
Rohit Pawar : आंबेडकरांमुळेच भाजपचे ७ खासदार,२२ आमदार निवडून आले..; पवार म्हणाले..त्यांना आत्मपरीक्षण..

"मीही अनेक दर्ग्यामध्ये, मशिदीमध्ये गेलोय. आपल्याच धर्मात फक्त काही जातीनांच गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो.असले वाद घालणारी लोकं कोत्या मनोवृत्तीची. त्र्यंबकेश्वरच्या गावकऱ्यांनी त्या वादावर बोलावं बाहेरच्यांनी यात काही पडायची गरज नाही. यात कुणाला दंगली घडवायच्या आहेत का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

Raj Thackeray
Drugs-on-cruise case : मलिकांनी वानखेडेंवर केलेले आरोप खरे ठरत आहेत..; रोहित पवार म्हणतात..

त्र्यंबकेश्वर प्रकरणात राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचं रोहित पवारांनी स्वागत केलं आहे. "राज ठाकरे आता सत्याच्या बाजूने आले आहेत," असे रोहित पवार म्हणाले. रोहित पवार यांनी प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधला आहे.

"प्रकाश आंबेडकरांच्या पक्षानं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आम्हालाही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा होऊ नये, यासाठी सगळ्यांनी एकत्रित आल पाहिजे," असे रोहित पवार म्हणाले. "प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या मतांमुळे भाजपचे सात खासदार आणि २२ आमदार निवडून आले," असे पवारांनी नमूद केले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com