मधू इथे अन् चंद्र तिथे! हनुमान चालिसावरून राज ठाकरेंनी राणा दाम्पत्याला सुनावलं

हनुमान चालिसावरून राज्यात मोठं राजकारण तापलं होतं.
MNS Raj Thackeray Latest Marathi News
MNS Raj Thackeray Latest Marathi NewsSarkarnama

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यातील सभेत पहिल्यांदाच राणा दाम्पत्यावर टीका केली. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांनी मातोश्रीसमोर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर मोठा राडा झाला होता. याचा उल्लेख करत राज ठाकरे यांनी राणा दाम्पत्याला सुनावलं. (MNS Raj Thackeray Latest Marathi News)

भाषणामध्ये बोलताना राज ठाकरे म्हणाले, मी सांगितलं होतं, मशिदीवर भोंगा वाजला तर त्यासमोर हनुमान चालीसा लावा. पण राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीसमोर चालीसा म्हणणार होते. अरे मातोश्री हा बंगला आहे मशीद आहे का, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. (Raj Tahckeray Rally in Pune)

MNS Raj Thackeray Latest Marathi News
भाषणाच्या सुरूवातीलाच राज ठाकरेंनी मन जिंकलं! 'त्या' चौघांना थेट नेत्यांच्या शेजारी बसवलं...

एवढं सगळं प्रकरण झालं, दोघांना अटक केली. मधु इथे आणि चंद्र तिथे, असा टोला राज यांनी लगावला. नंतर त्यांना सोडण्यात आले. शिवसेनेकडून त्यांना वाटेल ते बोलण्यात आले. त्यांच्याकडूनही शिवसेनेला वाटेल ते बोलण्यात आले. हा राडा तुम्ही सगळ्यांनी पाहिल्यानंतर लडाखमध्ये ते दाम्पत्य आणि संजय राऊत एकत्र जेवताना दिसले, असंही राज यांनी सांगितलं.

शिवसेनेमध्ये काम करणारी लोकं, शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांना या गोष्टींचं काहीच वाटत नाही. जी लोकं मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणार होते, एवढा राडा झाला, त्यांच्यासोबत तुम्ही लडाखमध्ये फिरताय. खांद्यावर हात ठेवून बोलताय. हे सगळे ढोंगी आहेत. ह्यांचं हिंदुत्व केवळ पकपकपक एवढंच आहे. यांना दुसऱ्या गोष्टी नको आहेत, अशी टीकाही राज यांनी केली.

MNS Raj Thackeray Latest Marathi News
वसंत मोरे थाटात आले पण नाराजी कायम! सभेच्या ठिकाणी येताच म्हणाले,

दरम्यान, भाषमाच्या सुरूवातीलाच सभागृहात काही अंध विद्यार्थी उपस्थित असल्याची माहिती राज ठाकरे यांना मिळाली होती. भाषणाच्या सुरूवातीलाच त्यांनी हे विद्यार्थी कुठे बसले आहेत, हे पाहिले. त्यानंतर चार विद्यार्थ्यांना थेट व्यासपीठावर घेऊन येण्यास सांगितले. व्यासपीठावर त्यांना इतर नेत्यांना शेजारी पहिल्या रांगेत बसवण्यात आले. राज ठाकरे यांच्या या कृतीचे मनसैनिकांनी टाळ्यांचा गजर करत कौतुक केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com