Raj Thackeray News: 'गुढीपाडव्याला 'सिनेमा' दाखवणार,' असं राज ठाकरे म्हणताच हशा पिकला ; पण, विरोधकांचे धाबे दणाणले..

Maharashtra Politics : मी तुम्हाला कुठलाही प्रोमो, टीझर देणार नाही,
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSarkarnama

Raj Thackeray On Shiv Sena : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज पनवेल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत झाली. राज्यातील सत्तासंघर्षावर त्यांना विचारण्यात येणाऱ्या विविध प्रश्नांना टाळत राज ठाकरेंनी सूचकपणे इशारा दिला.

मराठी भाषा, मराठी म्हणजे काय, मराठी नियतकालिक, वृत्तवाहिन्या, प्रसारमाध्यमांवर राज ठाकरे यांनी भाष्य केलं.शिवसेना पक्ष, धनुष्य़बाण याबाबत नुकताच केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह हे निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ चव्हाण यांना बहाल केले आहे.

Maharashtra Politics
Gautami Patil च्या Viral Videoची चाकणकरांनी घेतली दखल ; पोलिसांना दिला आदेश..

मी तुम्हाला कुठलाही प्रोमो, टीझर देणार नाही,

या विषयावर मुलाखतकाराने राज ठाकरे यांना दोन-तीन वेळा प्रश्न विचारला. या प्रश्नांना बगल देत राज ठाकरे यांनी याबाबत आपण गुढीपाडव्याच्या मेळाव्यात बोलणार असल्याचे सांगितले. "सध्याच्या राजकीय विषयावर बोलून मी तुम्हाला कुठलाही प्रोमो, टीझर देणार नाही, गुढीपाडव्याला सिनेमा दाखवणार," असे सांगत राज ठाकरेंनी विरोधकांना इशाराच दिला. 'गुढीपाडव्याला सिनेमा दाखवणार,'असे राज म्हणताच सभागृहात हशा पिकला.

Maharashtra Politics
Maharashtra Budget Session: आजपासून सुरु होणारे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हं : विरोधकांची रणनीती..

सविस्तर बोलणार

'महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो आहे. महाराष्ट्रात जे काही सुरू आहे, त्यावर सविस्तर गुढीपाडव्याच्या सभेत बोलणार आहे,'असे राज ठाकरे म्हणाले.

वर्तमानपत्र वाचत नाही

राज ठाकरे वर्तमानपत्र काढणार अशा चर्चा काही महिन्यापूर्वी सुरु होत्या. यावर विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले, "सध्या मीच वर्तमानपत्र वाचत नाही, त्यामुळे सध्या तरी वर्तमानपत्र काढण्याचा विचार नाही. चॅनल, वर्तमानपत्रे जाहिरातीवर चालतात. वर्तमापत्र काढण्याचे आता बघू पुढे," "मराठा दैनिकाचे हक्क मागायला गेलो होते. मात्र, त्यांनी दिले नाहीत," असे राज म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com