MNS News : राज ठाकरेंनी भाकरी फिरवली; दौऱ्यादरम्यानच घेतला मोठा निर्णय

Raj Thackeray News : राज ठाकरेंच्या निर्णयामुळे पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का
Raj Thackeray News
Raj Thackeray NewsSarkarnama

Thane News: आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला आतापासूनच सुरवात केली आहे. या पार्श्वभूमीवरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत कामाचा आढावा घेत आहेत.

या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. बदलापूर आणि उल्हासनगरमधील पक्षाची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. त्यामुळे बदलापूर आणि उल्हासनगरच्या पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

Raj Thackeray News
Karnataka Next CM: कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार?; डी के शिवकुमार यांनी दिले स्पष्ट संकेत

राज ठाकरे यांनी आज बदलापूर आणि उल्हासनगरमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. यावेळी कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्यासमोरच पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीचा पाढाच वाचला.

राज ठाकरे यांनी या तक्रारी ऐकून घेतल्या. त्यानंतर तडकाफडकी निर्णय घेत बदलापूर आणि उल्हासनगरची कार्यकारिणी बरखास्त करण्याची घोषणा केली. पक्षाअंतर्गत गटबाजीमुळे राज ठाकरेंनी हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.

Raj Thackeray News
Karnataka Election Result : किंगमेकर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या JDS ला 'अशी' लागली उतरती कळा?

दरम्यान, बदलापूर आणि उल्हासनगरची कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर आमदार राजू पाटील आणि जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना नवी कार्यकारिणी तयार करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले. त्यामुळे आता नव्याने कुणाला, कोणत्या पदाची संधी मिळणार? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

(Edited By : Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com