Raj Thackeray Meet Avinash Jadhav: राज ठाकरे खास शिलेदाराच्या घरी; अविनाश जाधवांच्या तब्येतीची केली विचारपूस

Avinash Jadhav: ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया झाली.
Raj Thackeray Meet Avinash Jadhav
Raj Thackeray Meet Avinash JadhavSarkarnama

Thane News: मनसेचा लढवय्या नेता, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा धाडसी शिलेदार आणि मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर काही दिवसांपूर्वीच हृदयाची शस्त्रक्रिया (बायपास) झाली. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

अविनाश जाधव यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर राज यांनी रुग्णालयात जाऊनही तब्येतीची विचारपूस केली होती. त्यानंतर पुन्हा सोमवारी त्यांनी घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. मात्र, राज ठाकरे हे ठाण्यात येणार असल्याची माहिती मनसेच्या एकाही पदाधिकाऱ्याला नव्हती. यानंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही जाधव यांची भेट घेतली.

Raj Thackeray Meet Avinash Jadhav
MLA Raju Patil On BJP: 'भाजपचं काय दुखतंय, अमित ठाकरेंचं बोलणं खुपतंय'; आमदार राजू पाटील मैदानात

अविनाश जाधव यांना मनसेचे धडाकेबाज नेते म्हणून ओळखलं जातं. मनसे पक्षाच्या स्थापनेपासून जाधव हे राज यांच्या सोबत असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यात जाधवांनी मोठंमोठे आंदोलन करत लोकांच्या अनेक प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले.

महाराष्ट्रात मनसे पक्षाची ताकद वाढण्यासाठी सातत्याने जाधव हे धडपड करताना दिसून येतात. तर अविनाश जाधव यांच्यावर मध्यंतरी तडीपारीची कारवाई करण्यात आली होती.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com