MNS : सांगितलं होतं ना आपल्या वाट्याला कुणी जायचं नाही, शेवटी मुख्यमंत्रीपद गेलं ना; राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सुनावलं

Raj Thackeray : ''निवडणुकीनंतर आपण सत्तेत असणार म्हणजे असणार..''
Raj Thackrey
Raj ThackreySarkarnama

Thane News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 वा वर्धापन दिन सोहळा आज ठाण्यातील गडकरी रंगायतन या सभागृहात पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच नाव न घेता सुनावलं.

राज ठाकरे म्हणाले, ''नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता असताना आपण तेथे अनेक कामे मार्गी लावली. तसेच नाशिक हे एकमेव शहर असं आहे तेथे पुढील पन्नास वर्षाचा पाण्याचा प्रश्न आपण मार्गी लावला.

मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नव्हते. मात्र, त्यांना मनसेमुळे चित्रपटगृह मिळू लागले. तसेच दुकानांवरील पाट्या मराठीत आपल्यामुळे झाल्या. मराठी पाट्यांवर आंदोलन करावं लागणं हे दुर्देव आहे'', असं ते म्हणाले.

Raj Thackrey
Maharashtra Session 2023: अर्थसंकल्पातील 'पंचामृत'साठी दीड लाख कोटी रुपयांची तरतूद

'''ब्ल्यू प्रिंट' सादर करणारा देशातील मनसे हा पहिला पक्ष आहे. पण तरही पत्रकार आम्हालाच प्रश्न विचारतात. पाकिस्तानी कलाकारांना २४ तासांत हुसकावून लावण्याचे काम आपण केलं. पण जे पक्ष हिंदुत्वादी म्हणून घेत होते ते पक्ष कुठे होते?, माझ्या आयोध्या दौऱ्यालाही हिंदुत्वादी म्हणणाऱ्यांनीच विरोध केला. यातही राजकारण झालं''.

''मशिदींवरील भोंग्याबाबत आंदोलन केलं होतं. तेव्हा शेकडो मनसैनिकांवर गुन्हे दाखल केले. पण सांगितलं होतं आपल्या वाट्याला जायचं नाही. शेवटी मुख्यमंत्री पदावरून जावं लागलं'', असं म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.

Raj Thackrey
High Court News : तत्कालीन महसूल राज्यमंत्री सत्तार यांच्या आदेशाने नेमलेली चौकशी समिती रद्द

''भाजपला २०१४ ला बहूमत मिळालं. त्या आधी भाजपनेही खस्ता खाल्या.तेव्हा कुठं आता भाजप सत्तेत आहे. आपणही सत्तेपासून दूर नाहीत. मी तुम्हाला आशा दाखवत नाही. मला माहीत आहे. आपल्याला महानगरपालिका जिंकायच्या आहेत. पण महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आपण सत्तेत असणार म्हणजे असणार'', असं म्हणत त्यांनी आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहेत.

''सध्या जनता या सर्वांना विटलेली आहे. मी बोलत राहणारच. मी मतदारसंघापर्यंत भाषणासाठी येईल. पण तुम्ही प्रत्येक घराघरांपर्यंत जा. आपण सत्तेपासून दूर राहणार नाहीत.लवकरच सत्तेत येण्यासाठी नवं निर्माणाचे काम आपण करणार आहोत. सध्या गलिच्छ राजकारणाला महाराष्ट्र विटला आहे'', अशी टीका त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com