'एकनाथ शिंदेंनी रात्री फिरवलेल्या कांडीनंतर उद्धव ठाकरे सगळीकडे फिरतायेत'

Raj Thackeray News : राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात...
Raj Thackrey
Raj ThackreySarkarnama

Raj Thackeray News : एकनाथ शिंदेंनी रात्री फिरवलेल्या कांडीनंतर उद्धव ठाकरे हे राज्यभरात सगळीकडे फिरतायेत, पण भूमिका बदलणाऱ्यातला मी नाही, उद्धव ठाकरे हे स्वार्थासाठी कधी हे कधी ते असं करतात. उद्धव ठाकरेंवर किती केसेस आहेत, हे त्यांनी सांगाव, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. ते मुंबईतील नेस्को मैदानावरील सभेत बोलत होते.

ठाकरे म्हणाले, ''खास फक्त गटप्रमुखांचा मेळावा आज आपण घेतला आहे. कारण ज्यावेळी लोकांना तो भेटत असतो त्यावेळी तो गटप्रमुख नसतो तर तो राज ठाकरे असतो. कोरोनाच्या काळपासून निवडणुका पुढे गेल्या आहेत. पण अजूनही महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये निवडणुका दिसत नाहीत. थेट फेब्रुवारीमध्ये निवडणुका लागतील अशी अपेक्षा करूयात'', असं ते म्हणाले.

''सध्या या गटाला मान्यता मिळणार का? मग त्या गटाला मान्यता मिळणार का? अशी सर्व परिस्थिती राज्यात सुरू आहे. पण ते जाऊद्या, महाराष्ट्रात असणाऱ्या सर्व पक्षापेक्षा जास्त यश हे मनसेच्या आंदोलनाला आले आहे. टोल नाक्याच्या आंदोलनामुळे जवळपास ६० ते ६५ टक्के टोलनाके बंद झाले. हे मनसेच्या (MNS) आंदोलनाचे यश आहे. गेल्या १६ वर्षामध्ये आपण कोणती आंदोलने केली याबाबत लवकरच एक पुस्तीका काढणार आहोत'', असं राज ठाकरेंनी सांगितलं.

Raj Thackrey
ठाकरे गटातील नेत्याने थेट मुख्यमंत्री शिंदेंसोबत असलेल्या नाराज नेत्यांची यादीच वाचली

''गुजरातमध्ये कॉंंग्रेस आमदार कल्पेश ठाकूरने आंदोलन केले. युपी-बिहारच्या लोकांना हकलून दिले. त्या आमदाराला भाजपने (BJP) नंतर उमेदवारी दिली. त्यांनी भूमिका बदलल्या. पण आपण कधीही भूमिका बलली नाही. त्यामुळे आपल्या भूमिका लोकापर्यंत योग्य प्रकारे गेल्या पाहिजेत, त्यासाठीच मनसे एक पुस्तीका काढणार आहे, असं ठाकरे म्हणाले.

''सध्या तर असं सुरू आहे की कोणतंही काम न करता फक्त हिंदुत्व-हिंदुत्व करत बसलेले काही जण आहेत. मात्र त्यांना हिंदुत्वाबाबत काहीही घेणं देणं नाही. एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली. त्यानंतर आता काही जण सगळीकडे फिरतात. पण त्यातला मी नाही. उद्धव ठाकरे हे सर्व स्वार्थासाठी करतात. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर किती केसेस आहेत, हे त्यांनी सांगाव. पाकिस्तानी कलावंताचा मुद्दा आला तेव्हा कुठे होते, असा सवाल यावेळी राज ठाकरेंनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com