MNS : राज ठाकरेंनी केली पदाधिकाऱ्यांची कान उघाडणी ; दिला 'हा' आदेश

Raj Thackeray : "वर्षभरात काय करणार आहात, याचा अहवाल द्या," असेही त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.
Raj Thackray
Raj ThackraySarkarnama

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज मुंबई बैठक होती. या बैठकीला मनसेचे सरचिटणीस, वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. (Raj Thackray latest news)

मुंबई महापालिका निवडणूक, राज ठाकरेंचा आगामी दौरा याविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली. मुंबईतील वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

"महाराष्ट्रातला प्रकल्प बाहेर जात असता आणि समजा आसामला गेला असता, तर मला वाईट नसते वाटले," असे राज ठाकरे म्हणाले.

राज्यातून पाच प्रकल्प अन्य राज्यात गेले, त्याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारला असले राज ठाकरे म्हणाले, “पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला पाहिजे. तो सगळ्या देशाचा असला पाहिजे. प्रत्येक राज्य मोठे झाले पाहिजे. प्रत्येक राज्यामध्ये उद्योगधंदे आले पाहिजे. तिकडच्या लोकांना तिथून बाहेर जायची आणि दुसऱ्या राज्यावर ओझं बनण्याची गरज नाही,"

'पंतप्रधान मोदी हे देशाचं आहे. प्रत्येक राज्य त्यांना मुलाप्रमाणे असलं पाहिजे. जर प्रकल्प आसामला गेला असला तर मला बरं वाटलं असतं' असं म्हणत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

"महाराष्ट्रातला प्रकल्प बाहेर जात असता आणि समजा आसामला गेला असता, तर मला वाईट नसते वाटले. म्हणजे आजही टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेला याचेही मला काही वाटत नाही. कारण तो देशातच आहे. पण वाईट एवढ्याचेच वाटते की, महाराष्ट्रात जो प्रकल्प येतोय आणि बाहेर जातोय तो गुजरातमध्ये जातोय. त्यामुळे मला असे वाटते पंतप्रधानांनी स्वत:हून याकडे लक्ष दिले पाहिजे” असे राज ठाकरे म्हणाले.

"महाराष्ट्र हा नेहमेची उद्योगधंद्याच्या बाबतीत प्रगती पथावर राहिलेला आहे. तसेच, उद्योगपतींनाही महाराष्ट्र हेच राज्य त्यांचे प्रथम क्रमांकाचे राज्य वाटत आले आहे. त्यामुळे याकडे राजकीय दृष्ट्या न पाहता, पंतप्रधान मोदींनी याकडे लक्ष दिले पाहिजे," असे ठाकरे म्हणाले.

आजच्या बैठकीबाबत राज ठाकरे म्हणाले, “ ही अराजकीय बैठक आहे, ती पक्षाच्या ज्या इतर संघटना ज्या आहेत, या संघटना बरीच वर्षे काम करत आहेत. काही संघटनांमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर, ते समजून घेणे, ऐकून घेणे आणि त्यावर तोडगा काढणे याच्यासाठी आजची बैठक आहे,"

Raj Thackray
CAG चौकशी राजकीय सुडबुद्धीतून ? ; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले..

"ध्येय धोरणांचा अहवाल द्या," असा आदेश राज ठाकरेंनी आजच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिला. "वर्षभरात काय करणार आहात, याचा अहवाल द्या," असेही त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

"मनसेच्या मुंबईतील गटप्रमुखांचा 27 नोव्हेंबर रोजी मोळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यानंतर म्हणजेच 28 किंवा 29 नोव्हेंबर रोजी मी कोकणाच्या दौऱ्यावर निघणार आहे. या दौऱ्यावेळी पहिले कोल्हापूरला अंबाबाईचे दर्शन घेणार आणि त्यानंतर कोकण दौऱ्याला सुरूवात करणार आहे," असे राज ठाकरेंनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in