MNS : मुंबईत मनसे स्वबळावर लढणार : २२७ जागांवर उमेदवार उभे करणार

MNS : "वेदांतासारखा प्रकल्प राज्याबाहेर जातो याची चौकशी झाली पाहिजे.
 MNS Sandeep Deshpande Latest News Updates, MNS Latest news
MNS Sandeep Deshpande Latest News Updates, MNS Latest newsSarkarnama

मुंबई : मुंबई महापालिका, ठाणे महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा कधीही होऊ शकतो. त्यात मनसे (mns) नेत्यांचं ‘वर्षा’वर येणं जाणं वाढलं आहे. गणपती दर्शन हे कारण असलं तरी, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट-मनसे एकत्र लढणार का, अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु आहे.

या सर्व पार्श्वभूमी मनसेचे नेता संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) मोठी घोषणा केली आहे. "मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सर्व जागा लढण्याची तयारी आम्ही सुरु केली आहे. आगामी काळातल्या सर्व महानगरपालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार आहे," असे संदीप देशपांडे म्हणाले.

"आम्ही मुंबईत २२७ जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. आम्ही स्वतंत्र्य आहोत, सध्या आमचा कुणासोबतही न जाण्याचा निर्णय झाला आहे," असे संदीप देशपांडे म्हणाले.

दीड लाख कोटींची गुंतवणूक व प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष 1 लाख रोजगार निर्माण करणारा वेदांता-फॉक्सकॉनचा महाराष्ट्रात येऊ घातलेला सेमीकंडक्टर प्रकल्प अखेर गुजरातने पळवला आहे. मंगळवारी कंपनीने गुजरात सरकारसोबत एमओयूची घोषणा केली.

 MNS Sandeep Deshpande Latest News Updates, MNS Latest news
Aarti Singh : राणांच्या राड्यावर आरती सिंग यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या..

हा प्रकल्प गुजरातला गेल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलासा करावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. यावर देशपांडे म्हणाले, "वेदांतासारखा प्रकल्प राज्याबाहेर जातो याची चौकशी झाली पाहिजे, या प्रकल्पामुळे राज्यातील तरुणांना रोजगार मिळाले असते. यात कोणीही राजकारण करू नका,"

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लवंगे गावात मुलं चोरीच्या संशयावरून यूपीतील 4 साधूंना बेदम मारहाण करण्यात आली.याबाबत देशपांडे म्हणाले, "सांगली साधू मारहाणीबाबत सरकारने योग्य कारवाई करावी, सरकार आता बदललं आहे,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in