अवघा महाराष्ट्र सोडवत असलेलं शब्दकोडं! मनसेनं फडणवीसांच्या स्टाईलनं अशी उडवली खिल्ली

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री महाविकास आघाडीची मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये महत्वाची बैठक झाली.
अवघा महाराष्ट्र सोडवत असलेलं शब्दकोडं! मनसेनं फडणवीसांच्या स्टाईलनं अशी उडवली खिल्ली
Mahavikas Aghadi Latest Marathi News, MNS Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री महाविकास आघाडीची मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये महत्वाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सर्व आमदार, प्रमुख नेते हजर होते. त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या बैठकीची खिल्ली उडवली आहे. (MNS Raju Patil Latest Marathi News)

मनसेचे (MNS) एकमेव आमदार असलेले राजु पाटील यांनी एका व्यंगचित्राच्या माध्यमातून आघाडीला डिवचलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आपल्या भाषणात अनेकदा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भाषणातील काही शब्दांचा उल्लेख करत खिल्ली उडवतात. याच स्टाईलने पाटील यांनी आघाडीला टोला लगावला आहे. (MNS criticizes Mahavikas Aghadi)

Mahavikas Aghadi Latest Marathi News, MNS Latest Marathi News
महाराष्ट्राच्या खलीला गरज तुमच्या मदतीची! वसंत मोरेंनी घातली साद

पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलं आहे की, 'आपलेच आमदार, अविश्वास दमदार, फुटायची भीती, बेकार मती, भ्रष्ट नीती!', अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेच्या सुरू असलेल्या धावपळीवरून टीका केली आहे. तसेच मतदान, आमदार, फोडाफोडी, पळवापळव, जमवाजमव, धडपड, धरपकड असे शब्दांचा उल्लेख करत अवघा महाराष्ट्र सोडवत असलेलं शब्दकोडं, असं म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यसभेच्या सहा जागांसाठीच्या निवडणुकीवरुन राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीमध्ये सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांची मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलवर बैठक झाली.

या बैठकीला 13 अपक्ष आमदाराही उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदारांच्या बैठकीत बोलताना म्हणाले की ''ही लढाई शंभर टक्के जिंकणार आहे. आघाडीचा विजय निश्चित आहे. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक जिंकल्यानंतर पार्टी करु, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आमदारांना विश्वास दिला. आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील. राज्यसभा निवडणुकीला बिनविरोधची परंपरा आहे. मात्र, ही परंपरा मोडीत निघाली त्याचे दुःख आहे. कितीही प्रयत्न केले तरी आघाडीचे चारही उमेदवार राज्यसभेत जातील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in