Raju Patil : महायुतीबाबत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी नेमकं काय म्हटलं ?

Raju Patil : मनसेने स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली असली तरी शिंदे गट, भाजप, मनसे यांची महायुती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Raju Patil News, Raj Thackeray News
Raju Patil News, Raj Thackeray NewsSarkarnama

Raju Patil : राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं युतीचं सरकार सत्तेवर आल्यापासून नवीन समीकरणं उदयास येत असल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे राज ठाकरेंची मनसे आणि शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्येही जवळीक असल्याचं समोर येत आहे.

दिवाळी निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही दादरमधील शिवाजी पार्क येथे मनसेनं दीपोत्सवाचे आयोजन केले होते. या दीपोत्सवात तीनही नेते एकत्र आले होते. त्यानंतर राज्यात नव्या समीकरणाची नांदीला सुरवात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबईसह राज्याच्या अनेक प्रमुख शहरातील महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. राज्याच्या प्रमुख पक्षातील नेते निवडणुकीच्या तयारीला देखील लागल्याचं चित्र आहे. मनसेने स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली असली तरी शिंदे गट, भाजप, मनसे यांची महायुती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजप,शिंदे गट आणि मनसे यांची युती होणार का ? यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. जर तशी वेळ आली आणि राजसाहेबांचे आदेश आले तर आम्ही युतीसाठी तयार असू असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे.

Raju Patil News, Raj Thackeray News
भाजप-शिंदे गटाच्या टार्गेटवर Bhaskar Jadhav का ? : शिवसेनेचा बालेकिल्ला कमकुवत करायचा ?

ते म्हणाले, "काही गोष्टी या राजकारण सोडून बघायला पाहिजे, सरकार जर आमच्या मागण्याचा सकारात्माक विचार करणार असेल तर जवळ येण्यास काहीच हरकत नाही. पूर्वीच्या सरकारमध्ये आमच्या मागण्याचा सकारात्मक विचार झालाच नाही. उलट त्या कशा पूर्ण होणार नाहीत याकडे लक्ष देण्यात आले,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com