भाजप, शिंदे गटाच्या वादात मनसेची उडी; खासदार श्रीकांत शिंदेंना फटकारले...

Raju Patil : चव्हाण यांचे हे वक्तव्य शिंदे समर्थकांना पचले नाही.
MNS MLA Raju Patil's Criticism to MP Dr. Shrikant Shinde
MNS MLA Raju Patil's Criticism to MP Dr. Shrikant ShindeSarkarnama

डोंबिवली : गेल्या अडीच वर्षांपासून आम्ही बोंबलत आहोत की येथे श्रेयाच्या लढाईत विकासकामे पुढे ढकलायची कामे सुरू आहेत. त्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी कुठेतरी मान्यता दिली आहे. ते जे काही बोलले त्याचे मी समर्थन करतो,असे वक्तव्य करत कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी चव्हाण यांना पाठिंबा देऊ केला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये रस्त्यांच्या कामावरून शिंदे-फडणवीस सरकारच्या नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरू असून मनसेने भाजपाला समर्थन देत शिंदे यांचे पुत्र तथा कल्याण लोकसभा खासदार डॉ. शिंदे यांना फटकारले आहे.

MNS MLA Raju Patil's Criticism to MP Dr. Shrikant Shinde
भाजपच्या मंत्र्याची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका; शिंदे गट आक्रमक...

कल्याण डोंबिवलीमधील खराब रस्ते, रस्त्यांच्या कामासाठी आणलेला विकास निधी यावरून गेले दिड वर्षे राजकीय कलगीतुरा रंगला आहे. राज्यात आता शिंदे-फडणवीस सरकार आले आहे. पुन्हा एकदा राज्यात शिवसेना-भाजपाने एकत्र चूल मांडलेली असली तरी कल्याण डोंबिवली मध्ये दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये रस्ते विकास निधीवरून जुंपली असल्याचे पहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीस सरकारच्या काळात मंजूर झालेल्या 472 कोटींचा निधी रद्द केला होता. त्यावरून शिवसेना भाजपा मध्ये बॅनरबाजी झाली होती.

शिंदे यांची ही गोष्ट त्यांच्याच मर्जीतील चव्हाण यांना चांगलीच जिव्हारी लागली असून ते अद्याप ते विसरलेले नाहीत असे दिसते. डोंबिवली मधील एका कार्यक्रमात मनातील खदखद त्यांच्या बोलण्यातून बाहेर आलेली दिसली. रद्द केलेला निधी पुन्हा मंजूर करत केलेले पाप धुवून काढा,असा टोला चव्हाण यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला. चव्हाण यांचे हे वक्तव्य शिंदे समर्थकांना पचले नाही. शिंदे गटाचे दीपेश म्हात्रे यांनी चव्हाण यांनी विकास कामे रखडवून पाप केली आहेत ते झाकण्याचा ते प्रयत्न करीत असल्याचा पलटवार केला आहे.

MNS MLA Raju Patil's Criticism to MP Dr. Shrikant Shinde
भास्कर जाधव एक दिवस रस्त्यावर दगड मारत फिरताना दिसतील; कदमांचा पलटवार

शिवसेना भाजपाच्या या वादात मनसेने उडी घेतली असून आमदार राजू पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे मी अभिनंदन करेल असे सांगत. येथे श्रेयाच्या लढाईवरून कामे पुढे ढकलायची कामे सुरू आहेत. त्याला कुठे तरी त्यांनी मान्यता दिली आहे. कारण 472 कोटींची जी कामे आली होती ती रद्द करून नवीन काम आणण्यात काही अर्थ नव्हता. ती कामे तशीच ठेवून दुसरी नवीन कामे आणायची होती. परंतु तसे न होता कुठे तरी श्रेयाच्या लढाईमध्ये काम रद्द करून नवीन काम सुचवली गेली. त्याचा डीपीआर आला निविदा निघाल्या पण यात लोकांचे दिड वर्ष गेले श्रेय घेण्याच्या नादात दिरंगाई होतेय.

चव्हाण यांचे अभिनंदन सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत येणाऱ्या दोन रस्त्यांच्या कामासाठीसाडे 26 कोटींचा निधी त्यांनी मंजूर केला आहे. ते नवीन मंत्री झालेत त्यांना थोडा वाव द्यायला हवा. डोंबिवली मध्ये पिडब्ल्यूडीचे रस्ते नाहीत. त्यांची वकिली करत नाही, पण त्यांना थोडा वाव देऊन, त्यांनी नाही केले तर स्थानिक आमदार म्हणून त्यांच्यावर ही टीका करेल. पण सध्या ते काही दिसत नाही, चव्हाण जे काही बोलले त्याचे मी समर्थन करतो. कुठेतरी नशिबाचा फेरा आमच्यावर उलटा फिरत होता तो उलटा न फिरता केवळ सत्तेची खुर्ची उभोगणाऱ्यावर फिरला आहे. एकमेकांची पाप कशाला धुता त्यापेक्षा चांगल काम करून पुण्य कमवा. त्या दुवा पुढे कामाला येतील, असा टोला त्यांची शिंदे समर्थक म्हात्रे यांना लगावला.

MNS MLA Raju Patil's Criticism to MP Dr. Shrikant Shinde
अकोल्यात भाजपला धक्का; शिवसेनेची मुसंडी, अपक्षांचे वर्चस्व!

मानपाडा रोडच्या कामासाठी आम्ही अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांनी निधी दिला असून टेंडर देखील निघाले आहे. वर्क ऑर्डर स्टेजला तो आलेला असून दसऱ्यानंतर त्याचे काम देखील सुरू होईल, असेही यावेळी आमदार पाटलांनी सांगितले. डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्यांचे 15 जुलै ला वर्क ऑर्डर निघून अजून कामाला सुरुवात झालेली नाही. निवडणूकीच्या तोंडावर ही कामे सुरू होणार का ? असा सवाल त्यांनी शिंदे गटाला केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in