मनसेचा राऊतांवर पलटवार; राज ठाकरे ओवैसी तर तुम्ही काय....

MNS| Shivsena| Raj thackeray| Sanjay Raut| संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना महाराष्ट्रातील असदुद्दीन ओवैसी म्हणून डिवचले होते.
मनसेचा राऊतांवर पलटवार; राज ठाकरे ओवैसी तर तुम्ही काय....
MNS| Shivsena|

मुंबई : ''ओबीसी कोणाला बोलता संजय राऊत? तुमचा कर्कश भोंगा बंद करा? तुम्ही मशिदींमधील मौलाना आहात का, असा सवाल करत मनसेने पोस्टरबाजीतून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर पलटवार केला आहे. मशिदींवरील भोंग्यांवरुन शिवसेना (Shivsena) मनसेत (MNS) चांगलीच जुंपली आहे.

दरम्यान, शुक्रवारी (15 एप्रिल) नाशिक मध्ये बोलताना संजय राऊत ( यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना महाराष्ट्रातील असदुद्दीन ओवैसी म्हणून डिवचले होते. त्यानंतर मनसे आक्रमक झाली असून मनसेने आज थेट दैनिक सामनाच्या कार्यालयाबाहेर पोस्टर बाजी करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

MNS| Shivsena|
निवडणुकांच्या तयारीवरील फोकस ढळू देऊ नका!

माहीम विधानसभा मतदार संघातील लक्ष्मण पाटील,उमेश गावडे,नितीन लाड या मनसेच्या कार्यकर्त्यानी ही पोस्टरबाजी केली आहे. मनसेच्या स्थापनेच्यावेळी संजय राऊत स्वत: राज ठाकरे यांची समजूत घालण्यासाठी कृष्णकुंजवर गेले होते. यावेळी आक्रमक मनसैनिकांनी संजय राऊत यांची गाडी पलटी केली होती. या घटनेचा फोटोही बॅनरवर लावला आहे. या घटनेची पुनरावृत्ती व्हावी का? असा इशारा ही मनसैनिकांनी या पोस्टरबाजीत दिला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये `एमआयएम`चे नेते असदुद्दीन ओवैसी (Asaduddin owaisi) कडून जे करून घेतले, ते महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्याकडून केले जात आहे. मात्र शिवसेना खंबीर आहे. शिवसेनेला त्याने काहीच फरक पडणार नाही, असे विधान संजय राऊत केले.

राज ठाकरे जी भूमिका घेतात, राज्यातील नेत्यांवर टिका करतात, त्याचा अर्थ जनतेला कळत नाही असे त्यांनी सजजू नये. उत्तर प्रदेशात भाजपने एमआयएमचा उपयोग करून घेतला. तसाच प्रकार त्यांना मराठी माणसांच्या महाराष्ट्रात करायचा मनसुबा आहे. महाराष्ट्राच्या हिताविरोधात सर्व सुरु आहे. काल परवा ज्यांनी हिंदुत्व स्वीकारले असे ओवेसी चालणार नाहीत. बाळासाहेबाचे शिवसैनिक हेच खरे हिंदूंचे रक्षणकर्ते आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.