फास आवळला; संदीप देशपांडे यांचा चालक पोलिसांच्या जाळ्यात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदिप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अडचणीत वाढल्या आहेत.
Sandeep Deshpande
Sandeep Deshpande Sarkarnama

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते संदिप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अडचणीत वाढल्या आहेत. पोलिसांनी देशपांडे यांच्या चालकाला अटक केली आहे. देशपांडे यांच्याविरोधात मुंबईतील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत. दरम्यान, देशपांडे यांनी आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. (MNS Sandeep Deshpande Latest News Updates)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मशिदींवरील भोंग्यांबाबतच्या इशाऱ्यानंतर चार मे रोजी मनसेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यादिवशी संदीप देशपांडे हेही राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थाबाहेर आले होते. याठिकाणी पोलीस देशपांडे यांना ताब्यात घेणार होते. पोलिसांच्या ताब्यातून ते निसटले. यावेळी एक महिला पोलीस कर्मचारीही जखमी झाली.

Sandeep Deshpande
बहुजनांचे हित कुठे, हे शीर्षासन करूनही मेंदूत शिरणार नाही! पडळकरांचा राऊतांवर हल्लाबोल

या घटनेनंतर पोलिसांनी संदीप देशपांडे, संतोष धुरीसह त्यांच्या चालकाविरूध्द सरकारी कामात अडथळा आणणे आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर अद्याप देशपांडे, धुरीसह चालकाचा पोलीस शोध घेते होते. त्यानंतर शुक्रवारी शिवाजी पार्क पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. त्यामुळे आता देशपांडे यांचाही ठावठिकाणा पोलिसांना लागण्याची शक्यता आहे. (Sandeep Deshpandes driver has been arrested by Mumbai Police)

काय घडलं होतं?

संदीप देशपांडे हे चार मे रोजी सकाळी शिवतीर्थावर आले होते. याठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस देशपांडे यांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात होते. यावेळी माध्यमांशी बोलल्यानंतर पोलीस त्यांना घेऊन वाहनात बसवण्यासाठी नेत होते. देशपांडेंभोवती पोलिसांसह माध्यमांच्या प्रतिनिधींचाही गराडा होता. पण तेवढ्यात देशपांडेंच्या वाहनचालकाने त्यांची गाडी पोलिसांच्या वाहनाजवळ आणून उभी केली. पोलिसांची नजर चुकवून देशपांडे आपल्या गाडीत बसले आणि चालकाने थेट गाडी पुढे नेली. हे लक्षात येताच पोलीस गाडीच्या मागे धावले, पण तोपर्यंत गाडी निघून गेली होती. आता पोलीस देशपांडे यांचा शोध घेत आहेत.

मी निर्दोष : संदीप देशपांडे

संबंधित महिला पोलिसाला आमचा स्पर्शही झाला नाही. मला पकडण्यासाठी पुरुष अधिकारी उपस्थित असताना ती तिथे काय करत होती, असा सवाल संदीप देशपांडे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून केला होता. मी पळून गेलो नाही. सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून आमच्यावर खोटे गुन्हे टाकले जातात. सीसीटीव्ही फुटेजमधून सत्य बाहेर येईल, असेही देशपांडे यांनी म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com