चिंता करू नका, 'साहेबांनी' देलेले 'घड्याळ' आहे आपल्याकडे ; मनसेनं शिवसेनेला डिवचलं

सरकार गमावल्यानंतर उद्धव ठाकरेंसमोर (uddhav thackeray) आता अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे.
sandeep deshpande Tweeter, Political Latest Marathi News, MNS Vs Shivsena News
sandeep deshpande Tweeter, Political Latest Marathi News, MNS Vs Shivsena Newssarkarnama

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना कुणाची, धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कुणाकडे जाणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवसेनेत उभी फूट पाडल्यानंतर शिवसेना पक्ष व धनुष्य बाण चिन्हावर शिंदे गटाने दावा केला आहे. आम्हीच शिवसेना पक्ष असल्याचे बंडखोरांचे म्हणणे आहे. त्यामुळे सरकार गमावल्यानंतर उद्धव ठाकरेंसमोर (uddhav thackeray) आता अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. (mns latest news)

आज सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे गट हा सामना रंगणार होता. मात्र याप्रकरणी आता खंडपीठ नेमण्याची सूचना सुप्रीम कोर्टानं दिली आहे. त्यामुळे बंडखोर गटाला दिलासा मिळाला आहे. मनसेनं (mns) शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Political Latest Marathi News)

संदीप देशपांडे यांनी टि्वट करीत उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. देशपांडेंनी आपल्या ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार दिपक केसरकर शिवसेनेचे नाव आणि चिन्ह असलेला बॅनर घेऊन जात असल्याचे दिसते. दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत उभे आहेत. “चिंता करू नका, 'साहेबांनी' देलेले 'घड्याळ' आहे आपल्याकडे ”, असे बोलताना दाखवले आहे. “आतातरी अक्कल येईल असे ‘चिन्ह’ दिसत नाही”, अशी कॅप्शन देशपांडे (sandeep deshpande) यांनी या फोटोला दिली आहे.

sandeep deshpande Tweeter, Political Latest Marathi News, MNS Vs Shivsena News
Maharashtra Legislative Council : विरोधीपक्षनेत्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादीत चुरस

शिवसेनेतून बंड केलेल्या १६ आमदारांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशिवाय आमदारांवर कोणताही कारवाई करु नये, अशी सूचना सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी विधानसभा अध्यक्षांना केली आहे. सरन्यायाधीशांच्या या निर्णयामुळे शिंदे गटातील बंडखोर आमदारांना एका प्रकारे दिलासाच मिळाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in