MNS On Sanjay Raut : राऊतांना जेल मधून लिखानाची परवानगी ?; मनसेचा 'रोखठोक' प्रश्न

मनसेच्या संदीप देशपांडेंनी खोचक टि्वट करीत शिवसेना आणि राऊत यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.
Sanjay Raut, sanjay raut
Sanjay Raut, sanjay rautsarkarnama

पुणे : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या (ED) अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना 8 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. संजय राऊत हे सामना या शिवसेनेच्या मुखपत्राच्या कार्यकारी संपादक पदाची धुरा सांभाळतात. त्यातील 'रोखठोक' मधून ते देशातील घडामोडींवर, विरोधकांवर भाष्य करीत असतात. (Sanjay Raut latest news)

आजच्या 'रोखठोक'मध्ये राऊतांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊत कारागृहात असताना रोखठोक सदर प्रसिद्ध करण्यात आले, यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राऊतांच्या 'रोखठोक'आक्षेप घेऊन त्यांची खिल्ली उडवली आहे.

राऊत हे शिवसेना मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक असल्याने त्यांची लेखनाची भूमिका भूमिका कोण पार पाडत आहे. राऊत ईडीच्या कस्टडीत आहेत मग रोखठोक कोण लिहित असेल असा प्रश्नही लोकांना पडला हाच धागा पकडून मनसेच्या संदीप देशपांडेंनी खोचक टि्वट करीत शिवसेना आणि राऊत यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.

"आज सामना मध्ये संजय राऊत यांच रोखठोक हे सदर आले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले राऊत हे काही स्वातंत्र सेनानी नाहीत की त्यांना जेल मधून लेखनाची परवानगी मिळावी की त्यांच्या नावावर दुसरंच कोणी लिहीत आहेत?," असा सवाल संदीप देशपांडे यांनी टि्वट करुन विचारला आहे.

Sanjay Raut, sanjay raut
N V Ramana : ठाकरे-शिंदे संघर्षांची सुनावणी करणाऱ्या सरन्यायाधीशांचा असा ही एक विक्रम !

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबईतील मराठी माणसाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. सामना मध्ये रविवाराचा रोख-ठोक संजय राऊत यांच्या नावाने लिहिण्यात आला आहे. यामध्ये कोश्यारी यांनी मुंबईसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर समाचार घेतला आहे. मुंबई, गुजरात, नेहरू आणि मोरोरजी देसाईंसह इतिहासाचे संदर्भ देण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com