Sandeep Deshpande Attack News: संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट ; राजकीय व्यक्ती मास्टरमाईंड...

Sandeep Deshpande Attack News Update : संदीप देशपांडे शिवाजी पार्क येथे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते.
Sandeep Deshpande Attack
Sandeep Deshpande Attack Sarkarnama

Sandeep Deshpande Attack News Update : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर तीन मार्च रोजी प्राणघातक हल्ला झाला होता.या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. देशपांडे यांच्या हल्लाच्यामागे काही राजकीय व्यक्तींचा हात असल्याचे संशय व्यक्त करण्यात आला होता. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

मुंबईच्या भांडूपमधून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कमध्ये संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला होता. देशपांडे यांच्यावरील हल्ल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं.

या प्रकरणात मनसे नेते अमेय खोपकरांनी ठाकरे गटाचे नेते , माजी मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांचे नाव घेतल्याने वातावरण तापले होते. राजकीय वैमन्यस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा पोलिसांना संशय होता.

तीन मार्च रोजी सकाळी संदीप देशपांडे शिवाजी पार्क येथे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यावेळी चेहऱ्यावर मास्क लावून काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर लोखंडी रॉड आणि स्टम्पने जीवघेणा हल्ला केला. त्यांना हिंदूजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

Sandeep Deshpande Attack
Ajit Pawar's Next Speech: पुढच्या सभेत अजितदादांच्या निशाण्यावर फडणवीस; नाव घेऊन भाषण करणार..

संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात कोणत्याही वरिष्ठ राजकीय नेत्याचा समावेश नसल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. अटकेतील चौघांपैकी अशोक खरात हाच मुख्य आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हल्ल्यानंतर प्रसिद्धी मिळून येणाऱ्या पालिका निवडणुकीत उमेदवारी मिळेल, या आशेने कट रचल्याची माहिती पोलीस सूत्रांची दिली.

Sandeep Deshpande Attack
Karnataka election 2023 : जुने म्हैसूर ठरवणार कर्नाटकचा किंग कोण ? तिहेरी लढतीत कोण बाजी मारणार..

"असे भ्याड हल्ले करुन कुणी जर आम्हांला घाबरवण्याचा प्रयत्न करणार असेल. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही कुणाला घाबरत नाही. घाबरणार नाही. कधीच आम्ही अशा हल्ल्याला भीक घालत नाही. माझ्यावर हल्ला करण्यामागे कोण लोक आहेत. हे सर्वांना माहीत आहे," असं सूचक वक्तव्य संदीप देशपांडेंनी केलं होतं.

देशपांडे यांच्यावर हल्ल्याची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासह नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, अमेय खोपकर, शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर, भाजप आमदार नितेश राणे यांनी रुग्णालयात जाऊन देशपांडेंची भेट घेतली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com