'पत्रकारांशी बोलून येतो, सांगत संदीप देशपांडे अन् संतोष धुरी शिवतीर्थाबाहेरुन पळाले'

Sandip Deshpande And Santosh Dhuri : वकिलांनी सांगितला नाट्यमय घटनाक्रम
Sandeep Deshpande
Sandeep DeshpandeSarkarnama

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावर आज सुनावणी पूर्ण झाली असून याबाबत सर्वोच्च न्यायालय गुरुवारी निर्णय देणार आहे. त्यामुळे अजून दोन दिवस या दोन्ही नेत्यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. मुंबई पोलिसांकडून अद्यापही शोध सुरु आहे. या दरम्यान पोलिसांनी देशपांडे यांच्या चालकाला अटक केली आहे. (MNS Sandeep Deshpande Latest News Updates)

संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याविरोधात मुंबईतील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेरुन पोलीस देशपांडे यांना ताब्यात घेणार होते. त्यावेळी पोलिसांच्या ताब्यातून ते निसटले. पण पळून जाताना पोलिसांशी झालेल्या झटापतीत एक महिला पोलिस कर्मचारी जखमी झाल्या आहेत. यावरुन दोघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र देशपांडे यांनी आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे.

Sandeep Deshpande
मुंबई, कोकणातल्या निवडणुका लांबणार; इतर पालिका, झेडपीच्या निवडणुका जून-जुलैमध्येच

दरम्यान आज सुनावणीवेळी सरकारी वकिल प्रदिप घरत यांनी देशपांडे आणि धुरी यांचा पळून जाण्याचा संपूर्ण घटनाक्रम नाट्यमयरित्या न्यायालयापुढे सांगितला. घरत म्हणाले, संतोष साळी, संदीप देशपांडे, संतोष धुरी राज ठाकरे यांच्या घरात गेले. बाहेर आल्यानंतर प्रतिबंधक कारवाई असून ताब्यात घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी त्यांना दिली. त्यावर पत्रकारांशी बोलून येतो असे दोघांनी सांगितले. पत्रकारांशी संवाद झाल्यानंतर ते हळू हळू चालत त्यांच्या गाडीजवळ गेले. त्यावेळी पोलिस त्यांना ताब्यात घेण्यासाठी गेले असता दोघेही चालत्या गाडीत बसून पळून गेले.

Sandeep Deshpande
'किसन वीर' अध्यक्षपदी आमदार पाटील बिनविरोध; खंडाळ्यानंतर आणखी एका कारखान्यावर वर्चस्व

चालकाने गाडीही वेगात दामटवत नेली. त्यांनी गाडीचा दरवाजा उघडा आहे हे देखील पाहिले नाही. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यावेळी झालेल्या पळापळीत महिला पोलिस ही जखमी झाल्या आहेत. संतोष धुरी यांना ताब्यात घेताना चालकाने गाडी चालवली. यावेळी गाडीचे एक चाक पोलिस अधिकाऱ्याच्या पायावरून गेले. त्यामुळे अधिकाऱ्यांची पकडही सैल झाली. तसेच धावत्या गाडीचा उघडा दरवाजा महिला पोलिस कर्मचाऱ्याला लागला आणि त्या जमिनीवर कोसळल्या. त्यांच्या पाठीला दुखापत झाली. पुढे काही अंतरावर आरोपींनी गाडी बदली करून ते नवी मुंबईच्या दिशेने गेले, अशी माहितीही प्रदिप घरत यांनी मुंबई सत्र न्यायालयात दिली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com