पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेेल्या संदीप देशपांडे अन् धुरींना न्यायालयाचा मोठा दिलासा

मनसेचे संदीप देशपांडे अन् संतोष धुरी यांचे शिवतीर्थाबाहेरून पलायन
Sandeep Deshpande, Raj Thackeray and Sanotsh Dhuri
Sandeep Deshpande, Raj Thackeray and Sanotsh Dhuri Sarkarnama

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि संतोष धुरी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या दोघांना सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यामुळं या दोन्ही नेत्यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार हटली आहे. या दोघांनी पोलिसांना धक्काबुक्की करून शिवतीर्थाबाहेरुन पलायन केले होते. पोलिसांच्या त्यांच्या मागावर होते पण ते सापडले नव्हते. अखेर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. (MNS Sandeep Deshpande Latest News Updates)

संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याविरोधात मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेरुन पोलीस देशपांडे यांना ताब्यात घेणार होते. त्यावेळी पोलिसांच्या ताब्यातून ते निसटले. पण पळून जाताना पोलिसांशी झालेल्या झटापतीत एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली होती. यावरुन दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र देशपांडे यांनी निर्दोष असल्याचा दावा केला होता.

Sandeep Deshpande, Raj Thackeray and Sanotsh Dhuri
भाजपचा दे धक्का! काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांनाच फोडलं

मागील सुनावणीवेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी देशपांडे आणि धुरी यांचा पळून जाण्याचा संपूर्ण घटनाक्रम न्यायालयापुढे सांगितला होता. घरत म्हणाले होते की, संतोष साळी, संदीप देशपांडे, संतोष धुरी राज ठाकरे यांच्या घरात गेले. बाहेर आल्यानंतर प्रतिबंधक कारवाई असून, ताब्यात घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी त्यांना दिली. त्यावर पत्रकारांशी बोलून येतो, असे दोघांनी सांगितले. पत्रकारांशी संवाद झाल्यानंतर ते हळूहळू चालत त्यांच्या गाडीजवळ गेले. त्यावेळी पोलीस त्यांना ताब्यात घेण्यासाठी गेले असता दोघेही चालत्या गाडीत बसून पळून गेले.

Sandeep Deshpande, Raj Thackeray and Sanotsh Dhuri
हार्दिक पटेल भाजपमध्ये जाणार? अखेर त्यांनीच मौन सोडून दिलं थेट उत्तर

चालकाने गाडीही वेगात दामटवत नेली. त्यांनी गाडीचा दरवाजा उघडा आहे हे देखील पाहिले नाही. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यावेळी झालेल्या पळापळीत महिला पोलीसही जखमी झाल्या आहेत. संतोष धुरी यांना ताब्यात घेताना चालकाने गाडी चालवली. या वेळी गाडीचे एक चाक पोलीस अधिकाऱ्याच्या पायावरून गेले. त्यामुळे अधिकाऱ्यांची पकडही सैल झाली. तसेच धावत्या गाडीचा उघडा दरवाजा महिला पोलीस कर्मचाऱ्याला लागला आणि त्या जमिनीवर कोसळल्या. त्यांच्या पाठीला दुखापत झाली. पुढे काही अंतरावर आरोपींनी गाडी बदलून ते नवी मुंबईच्या दिशेने गेले, असे घरत यांनी सत्र न्यायालयात सांगितलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com