"राऊतांनी मान्य केले दिवा मोठा होतोय" : 'त्या' शब्दावरुन शिवसेना-मनसेत जुंपली

shivsena| MNS| Raj Thackeray| Sanjay raut| उत्तरसभेत बोलताना प्रबोधनकार ठाकरेंचा दाखला देत राज ठाकरेंनी राऊतांचा उल्लेख लवंडे असा केला होता.
Sanjay raut| Raj Thackeray|
Sanjay raut| Raj Thackeray|

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी काल (12 एप्रिल) ठाण्यात उत्तरसभा घेतली. या सभेत शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊतांना(Sanjay Raut) राज ठाकरेंनी काल पुन्हा डिवचलं. प्रबोधनकार ठाकरेंचा दाखला देत राज ठाकरेंनी राऊतांचा उल्लेख लवंडे असा केला. त्याला राऊतांनी प्रत्युत्तर दिलं.या मुद्द्यावरुन आता शिवसेना-मनसेत जुंपली आहे. राऊतांनी दिलेल्या उत्तराला मनसेने पलटवार केला आहे.

Sanjay raut| Raj Thackeray|
मुंडेंना हृदयविकाराचा झटका नव्हेच; राजेश टोपेंनी सांगितले खरे कारण

राज ठाकरे यांनी कालच्या सभेत बोलताना संजय राऊतांनी चांगलीच आगपाखड केली. भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याबाबत बोलताना संजय राऊतांनी शिव्यांचा वापर केला. यावर काल राज ठाकरेंनी भाष्य केलं. ''नुसत्या प्रॉपर्टी जप्त केल्या तर हे लागले शिव्या द्यायला. संजय राऊत हे नेमके कुठले हेच कळत नाही. शिवसेना की राष्ट्रवादी? आमच्या आजोबांनी म्हणजेच प्रबोधनकारांनी अशा लोकांसाठी एक चांगला शब्द शोधला आहे. तो म्हणजे लवंडे..नीट शब्द पाहा अनुस्वार व वर आहे'', असं म्हणत राज यांनी राऊतांना डिवचलं.

त्यावर संजय राऊतांनी एका ओळीचं टि्वट करीत राज ठाकरेंना उत्तर देत, ''दिवा विझताना मोठा होतो! हे आज पुन्हा दिसले! जय महाराष्ट्र,'' असे म्हणत राऊतांनी एका अर्थानं 'मनसे हा संपत चाललेला पक्ष आहे,' असे पुन्हा सांगितलं. त्यानंतर संजय राऊतांच्या या उत्तरावर मनसे नेते योगेश खैरे यांनी पलटवार केला आहे. ''विझेल का आणखी मोठा उजेड देईल हे जनता आणि येणारा काळ ठरवेल.... पण मोठा होतोय हे तरी तुम्ही मान्य केलं हे बरं झालं...!! जय महाराष्ट्र !!'' असे ट्विट करत संजय राऊतांवर पुन्हा निशाणा साधला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com