मनसैनिकांच्या शिवसेना प्रवेशावर राजू पाटलांचा गंभीर आरोप; खोट्या केसेस...

Shivsena-MNS Politics | Raju Patil| मनसेच्या माजी नगरसेविक आणि काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
Shivsena-MNS Politics
Shivsena-MNS Politics Sarkarnama

Shivsena-MNS Politics

ठाणे : ''मनसेच्या नेत्यांना खोट्या केसेसच्या धमक्या देत दबाव टाकला जात आहे, असं घाणेरडं राजकारण करत जर कोणी पक्ष वाढवत असेल तर ही दुदैवी बाब आहे,'' असं म्हणत मनसे नेते म्हणत राजू पाटील यांनी शिवसेनेवर (Shivsena) गंभीर आरोप केले आहेत. पूजा पाटील आणि तालुका प्रमुख गजानन पाटील यांच्यासह मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (६ मे) शिवसेनेत प्रवेश केला.

शुक्रवारी (६ मे) मनसेच्या माजी नगरसेविक आणि काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशावर मनसे नेते राजू पाटील यांनी टीका केली आहे. काल मी नगरसेवक पदाधिकाऱ्याची भेटलो. खोट्या केसेसच्या धमक्या देत त्यांच्यावर दबाव टाकून पक्षांतर केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. भोंग्यांच्या राजकारणावरुन पोलिसांनी राजू पाटलांना कलम १४९ अंतर्गत नोटीस बजावली होती. या नोटीसीचा जबाब देण्यासाठई राजू पाटील डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात आले होते.

Shivsena-MNS Politics
''मी असेपर्यंत मुख्यमंत्रीपद...'': उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली शिवसैनिकांकडे 'ही' इच्छा

मनसेच्या दोन माजी नगरसेवकासह १० पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याबाबत राजू पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, असं घाणेरडं राजकारण करुन कोणी पक्ष वाढलत असेल तर ती दुर्दैवाची बाब आहे. पक्ष प्रमुख "कोत्या" मनाचे असतील, मग त्यांच्या पिल्लांकडून काय अपेक्षा करणार, असा खोचक टोलाही राजू पाटील यांनी लगावला आहे. दुसऱ्या पक्षातील लोकांना धमकावून त्यांना पक्ष बदलण्यास भाग पाडणे हे आम्हाला अपेक्षितच असल्यामुळे अशा घटना भविष्यात घडल्या तर आश्चर्य वाटणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. पण इथला प्रत्येत नगरसेवक, आमदार हा मनसैनिक असल्यामुळे कोण पक्षातून गेल्याने आम्हाला फरक पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विचाराची लढाई विचारांनी लढायची असते. पण दुर्दैवाने त्यांना हे समजवण्यासाठी त्यांच्याबरोबर कोणी नसल्याने त्यांची तत्वे धोरणे घेऊन चालले आहेत", असा टोलाही राजू पाटील यांनी लगावला. पण दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते, नगरसेवक पळवणे अशी कामे आम्हाला राज ठाकरेंनी शिकवली नाहीत. मला कोणी ठरवून त्रास देऊ शकत नाही. कोणी मला वैयक्तिक घेऊ नये", असा इशाराही राजू पाटील यांनी त्यांच्या विरोधकांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com