नवाबसेना प्रमुखांचं ढोंगी हिंदुत्व अन् मराठी प्रेम जनतेला कळून चुकलंय; मनसेनं पुन्हा डिवचलं...

MNS|Shivsena : ये तेरे बस की बात नही है मामु ...
Gajanan Kale, Uddhav Thackeray News, MNS news update in Marathi
Gajanan Kale, Uddhav Thackeray News, MNS news update in Marathisarkarnama

मुंबई : पीएफआय अर्थात पॅाप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या दहशतावादी कारवायांशी संबंध असलेल्या देशविघातक व देशद्रोही संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या बंदीचे स्वागत करत फेसबुक पोस्टद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Saha) यांचे अभिनंदन देखील केले आहे.

दरम्यान, याच मुद्द्यावरून मनसेकडून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष करण्यात आले आहे. पीएफआयच्या विरोधात चकार शब्द न बोलणारे आता जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो उच्चारणार म्हणे..,अशा शब्दात मनसे नेते गजानन काळे यांनी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भाषणाची ट्विटरच्या माध्यमातून खिल्ली उडवली आहे. (Gajanan Kale, Uddhav Thackeray News, MNS news update in Marathi)

Gajanan Kale, Uddhav Thackeray News, MNS news update in Marathi
मनसेने छगन भुजबळांना पाठविली सरस्वती मूर्ती

काळे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, "पीएफआय" च्या विरोधात चकार शब्द न बोलणारे आता जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो उच्चारणार म्हणे...नवाबसेना प्रमुखांच "ढोंगी हिंदुत्व"व "बेगडी मराठी" प्रेम महाराष्ट्रातील जनतेला कळून चुकलं आहे. ये तेरे बस की बात नही है मामु, अशा शब्दात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांना अप्रत्यक्षपणे डिवचलं आहे.

दरम्यान, पीएफआयकडून देशात घातपात, दहशतवाद पसरवण्यात येत असल्याची माहिती केंद्राच्या तपास यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर तातडीने हालचाली करत केंद्रीय तपास यंत्रणा आणि एटीएसने महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांमध्ये एकाचवेळी धाडसत्र सुरू केले. यातून पीएफआय व त्यांच्या संघटनेशी संबंधित शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईनंतर विशेषतः महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यात केंद्र सरकार व तपास यंत्रणेच्या विरोधात मुस्लीम संघटनांकडून निदर्शने करण्यात आली. पुण्यातील आंदोलनात तर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आला. या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत, पाकिस्तान जिदांबादच्या घोषणा देणाऱ्यांविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली होती.

Gajanan Kale, Uddhav Thackeray News, MNS news update in Marathi
‘शिक्षक`मध्ये ‘पदवीधर’ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपचा सावध पवित्रा

तसेच औरंगाबादमध्ये मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी थेट पीएफआयच्या कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न देखील केला. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पीएफआय संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या वेगवान घडामोडीनंतर देशात एकच चर्चा सुरू झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील या धडाकेबाज कारवाई आणि पीएफआयच्या बंदीच्या निर्णयाने खूष झाले आणि त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले होते.

आता यावरूनच मनसेनं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या भाषणा आधीच त्यांच्यावर टीका केली आहे. आता यावर सेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे बघावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com