ही सगळी 'असली' हिंदुत्वाची लक्षणे आहेत का? मनसेनं पुन्हा डिवचलं

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे 15 जून रोजी अयोध्येला जाणार आहेत.
Shiv Sena Leaders visit to Ayodhya
Shiv Sena Leaders visit to AyodhyaSarkarnama

मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Adity Thackarey) हे 15 जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. त्यासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी केली जात आहे. त्याआधी खासदार संजय राऊत, मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नेत्यांनी अयोध्येत जाऊल श्रीरामाचे दर्शन घेतले. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शिवसेनेला पुन्हा डिवचलं आहे. (MNS Latest Marathi News)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही अयोध्येला जाणार होते. त्यावरून अयोध्येत शिवसेनेकडून असली-नकली हिंदुत्वावरून बॅनरबाजी केली होती. पण राज ठाकरेंचा दौरा रद्द झाला. तर आदित्य ठाकरे हे 15 तारखेला अयोध्येत जाणार आहेत. त्याआधी शिवसेनेच्या नेत्यांनी अयोध्येत भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. (MNS Leader Gajanan Kale criticizes Shiv Sena)

Shiv Sena Leaders visit to Ayodhya
काँग्रेसची लोकसभेच्या पोटनिवडणुकीतून माघार; एकाही जागेवर नसेल उमेदवार

त्यानंतर मनसेचे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत शिवसेनेला डिवचलं आहे. 'मशिदीवरचे भोंगे न उतरवणारा, रस्त्यावरच्या नमाजावर बंदी न आणणारा, औरंगाबादचे संभाजीनगर न करणारा, औंरंग्याच्या थडग्यावर डोके ठेवणाऱ्या ओवेसीवर कारवाई न करणारा, समाजवादी पक्षाची मदत घेवून सरकार बनवणारा, ही सगळी असली हिंदुत्वाची लक्षणे आहेत का,' असा सवाल काळे यांनी केला आहे.

दरम्यान, राऊत यांनी सकाळी ट्विट करत अयोध्या भेटीची माहिती दिली. 'अयोध्येत ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामाचे मंदिर निर्माण कार्य सुरू आहे तेथे भेट दिली. महाराष्ट्राचे अनेक अभियंते निर्माण स्थळी काम करीत आहेत. हजारो करसेवक तसेच शिवसैनिकांच्या बलिदानाचे सार्थक झाले. याचा आनंद झाला,' असं राऊत यांनी ट्विट केलं आहे.

आज अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. अत्यंत सकारात्मक ऊर्जा असलेले हे तीर्थस्थान आहे. माझ्यासोबत एकनाथ शिंदे, वरुण सरदेसाई, सूरज चव्हाण, अनिल तिवारी, जीवन कामत होते. 15 तारखेस आदित्य ठाकरे या ठिकाणी भेट देतील. सोहोळ्याची जय्यत तयारी सुरू असल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com