एका खासदाराचे मत म्हणजे उत्तर प्रदेश असू शकत नाही, राज ठाकरेंचा कार्यक्रम ठरलाय!

अयोध्येतील भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याला तीव्र विरोध केला आहे.
एका खासदाराचे मत म्हणजे उत्तर प्रदेश असू शकत नाही, राज ठाकरेंचा कार्यक्रम ठरलाय!
Raj ThackeraySarkarnama

मुंबई : अयोध्येतील भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याला तीव्र विरोध केला आहे. उत्तर भारतीयांची माफी मागितील्याशिवाय त्यांना पाऊल ठेवू देणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे. तर दुसरीकडे मनसेने (MNS) अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी केली आहे. त्याअनुषंगाने मंगळवारी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंसोबत बैठक झाली. (Raj Thackeray Ayodhya Visit Marathi News)

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी एका खासदाराने मांडलेल मत हे उत्तर प्रदेशच असू शकत नाही, असं स्पष्ट केलं. त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. त्यावर पक्षप्रमुख बोलतील. आमचा अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित झाला आहे, असं नांदगावकर यांनी स्पष्ट केलं.

Raj Thackeray
आधी माफी मगच अयोध्या; महासभेतच ठराव केल्यानं राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या

अयोध्येमध्ये शिवसेनेकडून असली-नकली हिंदुत्वाचे फलक लावले आहेत. त्यावर बोलताना ते म्हणाले, पाहू, कोण असली कोण नसली? हिंदुत्वाचा खरा वारसदार कोण, हे लवकरच कळेल. त्यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यावाचून पर्याय नाही, असा टोला नांदगावकर यांनी लगावला.

शिवसेनेच्या नेत्यांकडून सातत्याने राज ठाकरेंसह मनसेवर टीका केली जात आहे. शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या सभेचा टीझरही रिलीज करण्यात आला आहे. पण त्यावर मनसेकडून प्रतिक्रिया आलेली नाही. त्यावर नांदगावकर म्हणाले, टोकाची भाषा आम्हालाही बोलता येते पण वेळ-काळ पाहिली पाहिजे. आता सगळे लोक जागे झालेत. सगळे हनुमान चालीसा म्हणू लागलेत. सगळे आयोध्येला जायला निघालेत, असा चिमटा नांदगावकर यांनी काढला.

Raj Thackeray
योगींचं मोठं पाऊल; यूपी सरकार मुंबईतही कार्यालय थाटणार

उत्तर प्रदेश सरकारकडून मुंबईत कार्यालय सुरू केले जाणार आहे. त्यावरही नांदगावकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 'अयोध्येत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यालय आहे. तिथे लोक बसतात. कार्यकर्ते तयार होत आहे. त्यामुळे मुंबईत उत्तर भारतीयांसाठी कार्यालय उघडत असतील तर हरकत नाही,' असं उत्तर नांदगावकर यांनी दिलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.