Kalyan-Dombivli News : 'शिवसेना पक्षाची चादर बाजूला काढून अंधारेंनी महाराष्ट्रात फिरावे; बाळासाहेबांचे खरे वारसदार कोण जनता त्यांना सांगेल'

Sushma Andhare News : मनसे नेते अविनाश जाधव यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली.
Avinash Jadhav, Sushma Andhare
Avinash Jadhav, Sushma AndhareSarkarnama

MNS leader Avinash Jadhav News : सुषमा अंधारे यांना फक्त बडबड करण्यासाठी ठेवले आहे. त्यांना जर खरंच असं वाटत असेल, मुखवटा वगैरे गळून पडला आहे. तर त्यांनी एक दिवस यावे आणि राज ठाकरे यांच्या समोर बसावे. त्यांना कळेल की खरा वारसदार कोण आहे. सुषमा अंधारे शिवसेनेची चादर बाजूला ठेऊन जर महाराष्ट्रात फिरल्या तर जनताच त्यांना पटवून देईल की बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण आहे. अशा शब्दांत मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे ठाणे जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी मंगळवारी अंबरनाथ, बदलापूर, कल्याण येथील कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी जाधव यांनी माध्यमांशी बोलताना अंधारे यांच्या टीका केली.

Avinash Jadhav, Sushma Andhare
Karnataka Elections : कर्नाटकात बुधवारी 'रणसंग्राम'; 5.31 कोटी मतदार ठरवणार सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात

अंधारे (Sushma Andhare) यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना बाळासाहेबांचे वारसदार असल्याचा बनावट गिरीचा मुखवटा गळून पडला आहे, असे म्हटले होते. त्याला उत्तर देताना जाधव म्हणाले, मला असं वाटतं की सुषमा अंधारे ताईंना यांच्यावर फक्त बडबड करण्याचीच जबाबदारी देण्यात आली असावी. त्या काय बोलतात, आजकाल महाराष्ट्रातील जनता त्यांना मनावर घेत नाही.

तसेच रिपब्लिकन पार्टीचे नेते सचिन खरात यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांना जर खरेच मराठीवर प्रेम असेल तर त्यांनी 'केरल फाइल्स' चित्रपट मोफत दाखण्याच्या पार्श्वभूमीवर शाहीर साबळे हा चित्रपट महाराष्ट्राच्या जनतेला मोफत दाखवावा, असे विधान केले होते. यावर बोलताना जाधव म्हणाले, मी तर हे नाव पहिल्यांदा ऐकले, या आधी मी नाव ही ऐकलेच नाही, असा टोला त्यांनी लगावला.

Avinash Jadhav, Sushma Andhare
Sai Resort Case : साई रिसॉर्ट प्रकरणी सोमय्यांचा फुसका बार; ईडीच्या आरोपपत्रात तर अनिल परबांचे नावच नाही

मला असं वाटतं की जर त्या व्यक्तीने पूर्ण माहिती घेतली असती, तर त्यांना कळलं असतं की शाहीर साबळे या चित्रपटाचा पहिला ट्रेलर जो लॉन्च झाला. हा राज ठाकरे यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या सभेत झाला. या चित्रपटाचा पुढचा भाग ज्याला म्युझिक लॉन्च म्हणतात या चित्रपटासाठी सगळी मदत ही राज ठाकरे यांच्याकडून झालेली आहे.

चित्रपटाला चित्रपटगृह मिळत नव्हते, हे मिळण्यासाठी राज ठाकरे यांनी अनेकांना फोन केले. चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांना जर त्यांनी हे विचारले तर ते नीट सांगतील. मात्र, मला असं वाटतं की ज्या माणसाला अर्धवट माहिती आहे. एखाद्या विशिष्ट भूमिकेतून त्यांनी भूमिका मांडायची म्हणून मांडली असेल तर अशांना उत्तर देणे मी गरजेचे समजत नाही, असेही जाधव म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com