BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे सज्ज; 9 तारखेला करणार अशी सुरुवात...

येत्या ९ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १७ वा वर्धापनदिन आहे.
BMC Election
BMC ElectionSarkarnama

BMC Election : येत्या ९ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १७ वा वर्धापनदिन आहे. यानिमित्त मनसेच्या वतीने ठाण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन कऱण्यात आले आहे.विशेष म्हणजे वर्धापनदिनाच्या दिवशी मनसेचे नवे गाणे प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाण्यात होणाऱ्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात पक्षाचे नवे गाणे प्रदर्शित केले जाणार आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि त्यांचे पुत्र ईशान खोपकर यांनी पक्षाच्या नव्या गाण्याची संकल्पना आणि निर्मिती केली आहे. अंधेरीतील यश राज स्टुडिओमध्ये सोमवारी (१३ फेब्रुवारी) मनसेच्या नव्या गाण्याचे रेकॉर्डिंग करण्यात आलं.

BMC Election
Ahmednagar Congress : नगर काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलच्या अध्यक्षपदी थोरात समर्थकाची वर्णी !

गाण्याच्या रेकॉर्डिंग नंतर मनसे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर करत 'यशराज फिल्म स्टुडिओत नेमकं काय शिजतंय?' असा सवाल विचारला आहे. गायक अवधूत गुप्ते यांनी हे गाण गायलं असून हितेश मोडक यांनी या गाण्याचे संगीत दिग्दर्शन केलं आहे. तर मंदार चोळकर यांनी गाणं शब्दबद्ध केलं आहे.

2017 च्या महापालिका निवडणुकीत अवधूत गुप्तेंनी मनसेसाठी 'माझ्या राजाला साथ द्या' हे गाणं संगीतबद्ध केलं होतं. या गाण्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. यावेळीही मनसे आगामी महापालिका निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. दरम्यान, 2007 साली अवधूत गुप्तेंच्या आवाजतलं 'शिवसेना गीत' आजही शिवसैनिकांच्या ओठांवर असते. अवधूत गुप्तेंनी आजवर अनेक राजकीय पक्षांसाठी गाणी गायली आहेत. अनेक राजकीय पक्षांच्या आणि सामान्यांच्या कार्यक्रमात त्यांची गाणी ऐकायला मिळतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in