'तर ब्रिजभूषण सिंह'ची तंगडी तोडल्याशिवाय मनसैनिक स्वस्थ बसणार नाही': मनसेचा इशारा

Raj Thackeray| mns|Brijbhushan singh| मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाल्यापासून मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे
'तर ब्रिजभूषण सिंह'ची तंगडी तोडल्याशिवाय मनसैनिक स्वस्थ बसणार नाही': मनसेचा इशारा
Vaibhav Khedekar| Brijbhushan singh

MNS Warns brijbhushhan singh

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाल्यापासून मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. उत्तर प्रदेशच्या लोकांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी घेतली. त्यानंतर मंगळवारी ब्रिजभूषण सिंह यांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतचा एक फोटोही मनसेने सोशल मिडीयावर टाकून राष्ट्रवादीवर आरोप केले. या आरोप -प्रत्यारोपांननंतर आता मनसेचे खेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून ब्रिजभूषण यांना थेट इशारा दिला आहे.

वाचा, काय म्हणाले वैभव खेडकर?

''राज ठाकरे यांनी पुण्याच्या सभेत अयोध्या दौरा रद्द करण्याचे कारण सांगितले. राज ठाकरे यांनी हिंदूत्त्वाची भूमिका घेतल्यानंतर अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. काहींनी हा दौरा राजकीय अॅंगलने पाहायला सुरुवात केली. राज ठाकरें बोलल्याप्रमाणे या सर्वांसाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. एकदंरीत राज ठाकरे यांना एकाकी पाडण्यासाठी हे सर्व केलं गेलं. पण आम्ही आधीही एकटे होतो आणि पूढेही एकटेच जाऊ. पण एक हिंदू दूसऱ्या हिंदूला आडवा कसा येतो यांच उत्तम उदाहरण ब्रिजभूषणच्या माध्यमातून पाहायला मिळालं.

राज ठाकरे रामलल्लांच्या दर्शनासाठी तिथे जाणार होते. पण हरामखोर ब्रिजभूषण सिंहने राजठाकरेंना अयोध्येत येऊ न देण्याची भूमिका घेतली. त्यांच्या समर्थकांकडून ५ तारखेला येणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला शरयू नदीत बुडवून ठार मारण्याची धमकी दिली. पण एमआयएमच्या त्या अकबरुद्दीन ओवेसीने औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली दर्शन घेतलं, त्याबाबत ब्रिजभूषण ने एक चकार शब्दही काढला नाही. हा सुपारीबाज ब्रिजभूषण हिंदू असून हिंदूना विरोध करतो ही खंत आहे.

त्यावरची कडी म्हणजे आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ब्रिजभूषण मुंबईत येऊन सभा घेणार असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे. पण या महाराष्ट्राची, राज ठाकरेंची शपथ घेऊन सांगतो ब्रिजभूषण ने या महाराष्ट्राच्या मातीत पाय ठेवून दाखवावा, त्याची तंगडी तोडल्याशिवाय राहणार नाही, मराठी माणसाला डुबवण्याची भाषा करणाऱ्या आणि एक हिंदू असून हिंदूला विरोध करणाऱ्या या नालायकाला या महाराष्ट्राच्या मातीत मातीत गाडल्याशिवाय एक महाराष्ट्र सैनिक शांत बसणार नाही, असा इशाराच वैभव खेडेकर यांनी दिला आहे. राज ठाकरेंनी सांगितल तरी गप्प बसणार नाही, असे खुले आव्हान वैभव खेडेकर यांनी केले आहे.

मग महाराष्ट्रात जे काही घडेल त्याला हा ब्रिजभुषण जबाबदार असेल, जी यादवी घडेल त्याला ब्रिजभूषण जबाबदार असे, त्याला त्याची जागा दाखवून देऊ, माझ त्याला महाराष्ट्रात येण्याच आमंत्रण आहे, त्याने कधीही महाराष्ट्रात यावं, गप्प बसलो म्हणून गांडूची औलाद आहे असं समजू नये, असंही वैभव खेडेकर यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in