राज ठाकरेंच्या सभेनंतर मनसे सरचिटणीसाचा सूचक इशारा

MNS| Raj Thackeray News| अयोध्या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला, त्याला रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली," असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला.
 Raj Thackeray
Raj Thackeray

Raj Thackeray Latest news update

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात जोरदार सभा घेत विरोधकांचा समाचार घेतला. "मी अयोध्या दौरा स्थगित केल्यानं अनेकांना वाईट वाटलं, काही जणांनी कुत्सितपणे प्रतिक्रियाही दिल्या, अयोध्या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला, त्याला रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली," असा गंभीर आरोप मनसेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी आजच्या सभेत केला.

 Raj Thackeray
'हिंदूत्व' वॉशिंग पावडर आहे का ? राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

या सभेनंतर विरोधकांनीही त्यांच्यावर टिकांचा वर्षाव केला. या आरोप प्रत्यारोपांच्या दरम्यान मनसे सरचिटणीस सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी केलेल्या ट्विटची चर्चा सुरु झाली आहे. ''राजसाहेबांचे आजचे भाषण म्हणजे मुत्सद्देगिरीचा उत्कृष्ट नमुना होय. मनसेला कुणीही म्हणजे कुणीही गृहीत धरू नये, हा त्याचा मतितार्थ. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप अशा सर्वांच्या वैचारिक आणि राजकीय मर्यादा साहेबांनी आज दाखवून दिल्या. आपली वाट योग्य आहे! इतरांची वाट लागणार आहे!!'' असे ट्विट करत सूचक इशारा दिला आहे.

दरम्यान, राज ठाकरेंनी आजच्या सभेत त्यांनी शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावर प्रहार केला. (raj thackeray latest news) "या सर्वांचं हिंदूत्व ढोंगी आहे.त्यांचं हिंदूत्व पोकळ आणि आमचं हिंदूत्व रिझल्ट देणार आहे. खरं हिंदूत्व आणि खोटं हिंदूत्व, हे काय वॉशिंग पावडर आहे का," असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

"माझी अयोध्या दौऱ्यांची तारीख ज्यांना तारीख खुपली, त्यांनीच हा सापळा रचला. त्यांना आमचं हिंदुत्व , भोंगे झोंबले, म्हणून त्यांनी हे केलं. उत्तरप्रदेशातील एक खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन देतो. माफी मागण्यास सांगतो, हे त्यांना आता कसे आठवलं ? अयोद्धा दौऱ्यात माझ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केलं असते, कार्यकर्त्यांना जेलमध्ये सडवलं असतं. ऐन निवडणुकीच्या वेळी मला कार्यकर्त्यांना गमावायचे नाही. माझी महाराष्ट्राची ताकद मी गमविणार नाही. मी वाटेल ती टीक सहन करण्यासाठी तयार आहे. माझ्या कार्यकर्त्यांना मी हकनार गमवणार नाही, पण यामुळे चुकीचे पायंडे पडत आहेत," असे राज ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com