MNS : मुंब्राचा 'नटसम्राट' ; राजीनामा देणाऱ्या लहान मुलांना बालदिनाच्या मोक्कार शुभेच्छा !

Gajanan Kale : काळे यांनी आव्हाडांचा एक जुना व्हिडिओ टि्वट केला आहे.
MNS Gajanan Kale
MNS Gajanan Kalesarkarnama

Gajanan Kale : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या विरोधात एका महिलेच्या तक्रारीवरुन विनयभंगाचा गुन्हा (Jitendra Awhad Booked Under Section 354) दाखल करण्यात आला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी थेट आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली. यानंतर ठाण्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर आले आहेत.

आव्हाड यांचा राजीनामा देण्याचा निर्णय, त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची रास्तारोको, जाळपोळ यावर महाराष्ट्र मननिर्माण सेनेने भाष्य केले आहे. मनसेचे नेते गजानन काळे यांनी आव्हाडांची खिल्ली उडवली आहे. काळे यांनी आव्हाडांचा एक जुना व्हिडिओ टि्वट केला आहे.

गजानन काळे म्हणाले, "राहुल गांधींची भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये आली आहे. या यात्रेचे लक्ष आपल्याकडे वेधवून घेण्यासाठी आव्हाडांनी नाटक केलं आहे. या कलाकाराला राज्याने ओळखावे,"

"ठाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्यांनी साजरी केली नाही, विधानसभा अध्यक्षांकडे नाही तर ट्विटरवर आपल्या आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या लहान मुलांना बालदिनाच्या मोक्कार शुभेच्छा," अशा शब्दात गजानन काळेंनी आव्हाडांना डिवचलं आहे.

MNS Gajanan Kale
Rohit Pawar : पवार म्हणाले, 'शिंदे सरकारचं आता अती होतयं, हा रडीचा डाव..'

"सरकारचं आता अती होतंय! एकदा प्रयत्न करून बघितला पण सत्याचा आवाज दाबता येत नाही म्हणून दुसऱ्या गुन्ह्यात गोवणं हा रडीचा डाव आहे!

तक्रारदाराची राजकीय पार्श्वभूमी आणि तो व्हिडिओ बघितला तर कोणतीही महिला भगिनी सांगेन की, सत्य काय आहे?," असे टि्वट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.

कळवा खाडी पुलाचे उद्धाटन काल (रविवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या उद्धाटन कार्यक्रमावेळी आव्हाड यांनी धक्का दिल्याचा आरोप भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. याबाबत मुंब्रा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in