Raj Thackeray : राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण ? आता कुणाला फटकारे बसणार..

राज ठाकरे यांचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
raj thackeray
raj thackeray

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्यांची तब्येत ठिक असून त्यांची विचारपूस करण्यासाठी अनेक नेत्यांनी राज ठाकरेंच्या "शिवतीर्थ"ला भेट दिली. (raj thackeray latest news)

काल (गुरुवारी) ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो मनसेनं सोशल मीडियावर (social media) शेअर केले आहेत. त्यानंतर राज ठाकरे यांचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

राज्यातील सत्तासंघर्षानंतर राज ठाकरेंनी शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्यावर भाष्य करण्याचे टाळले असले तरी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांचे अभिनंदन केलं आहे. फडणवीस यांनीही त्यांची भेट घेतली.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांना फोन केल्याची माहिती समोर आली होती. बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आता सक्रिय होत असताना दिसते.

raj thackeray
भाजपकडून मुर्मू यांचा विजयाचे आदिवासी पाड्यावर ‘सेलिब्रेशन’

राज ठाकरेंचा सध्या जो फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यातून अप्रत्यक्षरित्या ते अॅक्शन मोडमध्ये येत असल्याचे संकेत देत असल्याचे बोललं जाते. राज ठाकरे यांच्या हातात ब्रश असल्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.

राज हे व्यंगचित्रकार असून यापूर्वी त्यांनी व्यंगचित्रातून अनेकांची खिल्ली उडवून राजकीय घडमोडींवर भाष्य केलं आहे. व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांनी अनेकदा विरोधकांवर टीका केली आहे. त्यांच्या व्यंगचित्रांची चांगलीच चर्चा होते.

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांचं नवं व्यंगचित्र त्यांच्या समोर आलेलं नाही. आता राज ठाकरे यांनी हातात ब्रश घेतलेला फोटो व्हायरल झाल्याने राज आता कुणावर निशाणा साधणार याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे. सध्याच्या राजकीय घडामोडीवर भाष्य करणारं ते व्यंगचित्र काढत असतील का ? असा प्रश्न देखील अनेकांना पडला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in