
मुंबई : पायाच्या आजारामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे लिलावती रुग्णालयात दाखल होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती, पण त्यांना कोरोनाची लागण झाल्याने ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.
शस्त्रक्रियेपूर्वी त्यांच्या वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या, यामध्ये त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे त्यांच्या पायावर होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. कोविड डेड सेल्समुळे त्यांना भूल देण्यावर बऱ्याच मर्यादा येत असल्याने ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असल्याचे राज ठाकरे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॅाक्टरांन सांगितले. (MNS Raj Thackeray Latest News in Marathi)
पुण्यातील सभेत राज ठाकरे यांनी आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. काही दिवसांपासून आपल्याला पायाच्या दुखण्याचा त्रास सुरुअसल्याचे त्यांनी सांगितले होते. डॉक्टरांनी त्यांना दोन ते तीन महिने आराम करण्याचा सल्ला दिल्याचेही त्यांनी सांगितले होते. दरम्यान, पायाच्या दुखण्यावरील शस्त्रक्रिया करुन घेण्यासाठी ते रुग्णालयात दाखल झाले होते. यावेळी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, मनसेचे नेते बाळा नांदगावकर उपस्थित होते.
राज ठाकरे यांच्या पायावर आज ( 1 जूनला) शस्त्रक्रिया पार पडणार होती. त्यामुळे राज ठाकरे रूग्णालयातून घरी परतले आहेत. राज ठाकरे यांना कोरोना होण्याची ही दुसरी वेळ आहे. राज यांना याआधी 23 ऑक्टोबर 2021 ला पहिल्यांदा कोरोना झाला होता.
मुंबईत आटोक्यात आलेली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा डोकं वर काढतेय.गेल्या दीड ते दोन महिन्यांत १०० च्या खाली दैनंदिन स्थरावलेली रुग्णसंख्या गेल्या आठवड्यापासून ३०० च्या वर आढळू लागलीय. काल ( ३१ मे) हीच रुग्णसंख्या ५०६ वर एका दिवसात रुग्ण आढळण्यापर्यत पोहचलीय . सध्या दैनंदिन वाढणारी ही रुग्णसंख्या चिंता वाढवणारी आहे
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.