ग्रामपंचायत निवडणुकांत मनसेनं अस्तित्व दाखवलं अन् राज ठाकरे मनसैनिकांना म्हणाले...

राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत मनसेने अस्तित्व दाखवून दिलं आहे. ग्रामीण भागातही मनसेचा आता प्रवेशहोऊ लागला आहे.
mns chief raj thackeray congratulates winning candidate of gram panchayat
mns chief raj thackeray congratulates winning candidate of gram panchayat

मुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) अस्तित्त्व दाखवून दिलं आहे. ग्रामीण भागातही मनसेचा आता प्रवेश होऊ लागला आहे. ठाणे, बीड, बुलडाणा, नगर जिल्ह्यात प्रत्येकी एक ग्रामपंचायत मनसेने ताब्यात घेतली आहे. या विजयी मनसैनिकांचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अभिनंदन केलं असून, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. 

राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, ग्रामपंचायत निवडणुकीत माझे जे महाराष्ट्र सैनिक विजयी झालेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. तुमच्या गावासाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा. बाकी तुम्हा सर्वाना मी लवकरच भेटणार आहे. काळजी घ्या.

ठाणे, बीड, बुलडाणा, नगर जिल्ह्यात प्रत्येकी एक ग्रामपंचायत मनसेने ताब्यात घेतली आहे. उस्मानाबादमधील जळकोट ग्रामपंचायतीत जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे विजयी झाले आहेत. अंबरनाथमधील काकोळी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने हातमिळवणी केली होती. मनसेने या युतीच्या पॅनलचा पराभव करत वर्चस्व प्रस्थापित केलं. सात जागांच्या या निवडणुकीत मनसेने चार जागांवर विजय मिळवला. 

बीडच्या केज तालुक्यातील नारेवाडी ग्रामपंचायतीवर मनसेने झेंडा फडकावला आहे. या ग्रामपंचायतीमधील सात पैकी पाच जागांवर मनसेच्या सदस्यांचा विजय झाला आहे. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गटाने शिरसाठवाडी ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. या ग्रामपंचायतीमध्ये एकूण 9 जागा होत्या. या सर्व जागा मनसेच्या अविनाश पालवे पॅनेलने जिंकल्या.

बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगाव ग्रामपंचायतीमध्ये मनसेने विजय मिळवला. नऊपैकी सात जागांवर मनसेने विजय मिळवला आहे. रत्नागिरीमध्ये दापोलीतील नवशी ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचे उपतालुकाध्यक्ष मिलिंद गोरीवले यांचा विजय झाला आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com