मनसेने थेट `मातोश्री`बाहेर फलकबाजी करत मुख्यमंत्र्यांना विचारला सवाल... - MNS asks questions about electricity bill to CM Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आज एकाच व्यासपीठावर

मनसेने थेट `मातोश्री`बाहेर फलकबाजी करत मुख्यमंत्र्यांना विचारला सवाल...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 1 जानेवारी 2021

मनसेच्या या फलकाला आता शिवसेना काय उत्तर देणार? 

मुंबई : मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात `मातोश्री` या त्यांच्या निवासस्थानाबाहेर बॅनर लावले. मनसेच्या या बॅनरमध्ये वीजबिलांवरुन राज्य सरकारवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री महोदय, गोड बोलता बोलता
एक नवीन वर्ष आले, गोड बातमी तर दूर राहिली
पण जनतेचे हाल झाले... 
जनतेच्या खिशात पैसा नाही तरी
वीजबिल भरा असे उर्जामंत्री म्हणाले
मुख्यमंत्री साहेब सरकार इतके निर्दयी कसे काय झाले?

असा मजकूर लिहून मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. कोरोना लॉकडाउनच्या काळात अनेक ग्राहकांना वाढीव वीज बिलं आली होती. याबाबत सरकारकडून त्यात सवलत देण्याचं आश्वासन देण्यात आले होते. मात्र तशी कोणतीही सवलत देण्यात आली नाही. लॉकडाउनमुळे लोकांना आर्थिक अडचणी सहन कराव्या लागल्या. त्यामुळे सरकारने वाढीव वीज बिलांचा विचार करावा असं आवाहन मनसेने केले होते. तसेच भाजपानेही वारंवार लोकांना वाढीव वीजबिलांमधून सवलत द्यावी अशी मागणी केली होती.

आधी सरकारने नागरिकांना वाढीव वीजबिल कमी करुन देण्याचे आश्वासन दिले. नंतर घूमजाव करण्यात आले. त्यामुळे मनसेने नव्या वर्षाच्या शुभेच्छांचं बॅनर लावत असतानाच त्याच बॅनरमधून मुख्यमंत्र्यांना वाढीव वीजबिलांवरुन प्रश्न विचारला आहे. वाढीव वीज बिलं माफ केली जावीत यासाठी मनसेकडून आंदोलनही करण्यात आले होते. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली होती. मात्र आश्वासनांशिवाय राज्य सरकारने पुढे काहीच केले नसल्याचा मुद्दा या निमित्ताने मनसेने मांडला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख