मनसेची गृहखात्याची मागणी : शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी अमित ठाकरेंनी सांगितली अट

MNS | Amit Thackeray : नुकतीच देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती.
Amit Thackeray
Amit Thackeraysarkarnama

मुंबई : गृहमंत्री पद मिळत असल्यास शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत विचार करू, असे मोठे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) युवा नेते आणि पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी केले आहे. मनसेच्या संवाद दौऱ्यादरम्यान त्यांनी शुक्रवारी अंबरनाथला भेट दिली. त्यावेळी प्राचीन शिवमंदिरात दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.

अमित ठाकरेंच्या या विधानानंतर मागील आठवड्यात झालेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीदरम्यान शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी मनसेने भाजप-शिंदेंसमोर गृहमंत्रीपदाची अट ठेवली आहे का अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. नुकतीच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी जावून भेट घेतली होती. त्यावेळी या दोघांमध्ये सुमारे तासभर खलबतं झाली.

अमित ठाकरेंचा संवाद दौरा अंबरनाथमध्ये :

मनसेच्या संवाद दौऱ्यात अमित ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबई ते अंबरनाथदरम्यान लोकलने प्रवास केला. यानंतर त्यांनी प्राचीन शिवमंदिराला भेट दिली आणि बाहेर येवून पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी मनसेला दोन मंत्रिपदे मिळणार असल्याच्या चर्चांबद्दल अमित ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी गृहमंत्री पद देणार असतील तर सत्तेत सहभागी होऊ असे ते म्हणाले. त्याचवेळी ते देत नसल्याचा मिश्कील टोलाही त्यांनी लगावला.

आगामी नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून त्याबाबतचा अहवाल मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना सादर केला जाणार असल्याची माहिती यावेळी अमित ठाकरे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in