'टोमणे मेळावा'साठी परवानगी देऊन टाकावी; मनसेने पुन्हा शिवसेनेला डिवचले

MNS-Shivsena dispute| शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा होऊच नये, यासाठी शिंदेचे गटाचे आमदार आणि भाजप प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे
MNS-Shivsena dispute|
MNS-Shivsena dispute|

मुंबई : राज्यातील शिंद गटाचे सरकार आल्यापासून शिवसेना विरुद्ध शिंदे गट, भाजप आणि मनसे यांच्यात सातत्याने आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता शिवसेना आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यावरुन राजकारण तापलं आहे. शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा होऊच नये, यासाठी शिंदेचे गटाचे आमदार आणि भाजप प्रयत्न करत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. शिवसेना शिंदे गटात दसरा मेळाव्यावरुन कलगीतुरा रंगलेला असताना त्यातही मनसेने उडी घेतली आहे.

मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 'मुंबई मनपा व राज्यसरकारने शिल्लक सेनेला शिवतीर्थावर"टोमणे मेळावा"साठी परवानगी देवून टाकावी. आणि खंजीर,मर्द,मावळा,वाघनखं,गद्दार,निष्ठा यातून होणाऱ्या मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेवू नये. तसेही यावेळची स्क्रिप्ट बारामती वरून येणार आहे, अशी टीका गजानन काळे यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर 'अबू आझमी व ओवेसी स्टेजवर असणार आहेत का ?' असा खोचक सवालही या ट्विटमधून विचारला आहे.

MNS-Shivsena dispute|
शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार?; या कारणामुळे शोधला पर्याय

दोन दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनात बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना व आदेश दिले. दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी रणनीती संदर्भात उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केले. शिवतीर्थावर दसरा मेळावा हा शिवसेनेचाच होणार. कोणीही मनात संभ्रम ठेवू नका. महिला आघाडी, युवा सेना, शिवसैनिकांनासोबत घ्या, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

दरम्यान, दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर भरतो. प्रथेप्रमाणे यंदाही दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे, यासाठी शिवसेनेकडून अर्ज करण्यात आला होता. मात्र, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बंडखोर आमदारांच्या गटाने दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे दसरा मेळाव्यावरून दोन गटात जुंपली होती. त्यामुळे शिवाजी पार्कवर नेमका कोणाचा दसरा मेळावा होणार, याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com