भिवंडी-ठाणे मार्गावरील टोल नाक्यावर मनसेचं खळ्ळ खटॅक

बॅट आणि लाकडी दांडक्यांच्या सहाय्याने मनसे (mns) कार्यकर्त्यांनी टोल नाक्याच्या काचा फोडल्या.
mns
mns sarkarnama

ठाणे : भिवंडी-ठाणे हा महामार्गावर नेहमीच वाहतुक कोंडी होते. हा रस्ता नेहमीच वाहनांनी गजबजलेला असतो. या महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. येथील टोल कंपनी आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मार्गाकडे दुर्लक्ष केले आहे. मनसेच्या इशाऱ्यानंतरही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष केले. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले नाही, त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यक्रर्त्यांना येथे आंदोलन केलं.

गणेशोत्सवाच्या आधी हे खड्डे बुजवण्यात यावेत, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यावेळी मनसेने दिला होता. भिवंडी-ठाणे रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत, अन्यथा टोल नाका तोडून टाकण्यात येईल, असा इशारा काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. हा इशाऱ्यानंतर रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले नाही. आज संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी या टोलनाक्याची तोडफोड केल्याचे मनसेने सांगितले आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.

भिवंडी-ठाणे रस्त्यावरील कशेळी येथील टोलनाक्यावर ही घटना घडली. बॅट आणि लाकडी दांडक्यांच्या सहाय्याने कार्यकर्त्यांनी टोल नाक्याच्या काचा फोडल्या. मनसेचे ठाणे जिल्ह्याचे सचिव संजय पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com