ठाकरेंच्या शिवसेनेवर काँग्रेसची कुरघोडी; नाना पटोलेंनी केला मोठा दावा

Shivsena | Congress | Nana Patole : सरकार, मुख्यमंत्री पाठोपाठ आता विरोधी पक्षनेतेपदही जाणार?
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

मुंबई : विधान परिषदेत शिवसेनेचे (Shivsena) ११ आमदार असून विरोधी पक्षात सर्वाधिक आमदारांची संख्या शिवसेनेचीच आहे, असे म्हणतं ठाकरेंच्या शिवसेनेने विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर यापूर्वीच दावा केला आहे. अशातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही शिवसेनेवर कुरघोडी करत जाहीरपणे माध्यमांसमोर येवून विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळावे अशी मागणी केली आहे. यासाठी काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे शिवसेना आणि राष्ट्रवादीशी चर्चा करत आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले यांनी "वरच्या सभागृहात आमचा विरोधीपक्ष नेता व्हावा अशी प्रमुख मागणी राहिल. शिंदे गट-भाजप सरकार राज्यात स्थापन झाल्यावर विधानसभेत राष्ट्रवादीचे अजित पवार यांची विरोधीपक्षनेते म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर विधानपरिषदेत आमचा विरोधीपक्षनेता असावा अशी मागणी आम्ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे करणार असल्याचे म्हणतं पटोले यांनी दावा केला आहे.

दरम्यान पटोलेंच्या या दाव्यानंतर विरोधी पक्षनेते पदावरुन काँग्रेस आणि शिवसेनेत असा सामना रंगण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेची संख्या जास्त असून आपला विरोधी पक्षनेता विधान (Leader of the Opposition) परिषदेत नेमण्यात यावा, याविषयीचा ठराव शिवसेनेने यापूर्वीच विधान परिषद (Legislative Council) आमदारांकडून उपसभापती नीलम गोर्‍हे (Neelam Gorahe) यांना सुपूर्द करण्यात आला.

विधान परिषदेतील शिवसेना आमदारांची बैठक ९ जुलै रोजी 'मातोश्री' निवासस्थानी पार पडली. या बैठकीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता, गटनेता, प्रतोद नियुक्तीचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आल्याचा ठराव करण्यात आला, अशी माहिती आमदार सुनील शिंदे यांनी दिली होती. तसेच विधान परिषदेत विरोधी पक्षातील शिवसेना आमदारांची संख्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावर दावा करणारे पत्र विधान परिषद उपसभापती नीलम गोर्‍हे यांना देण्यात आले, अशीही माहितीही आमदार शिंदे यांनी दिली होती.

यावेळी बोलताना पटोले यांनी इतरही अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांची मते फुटली होती. त्यानंतर नव्या सरकारच्या बहुमत चाचणी आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवेळी देखील काँग्रेसचे तब्बल ११ आमदार गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली होती. त्यानंतर राज्यातील पक्षांच्या घडामोडींचा अहवाल काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने मागवला होता. केंद्रीय नेतृत्वाने मागविलेला या संदर्भातील माहितीचा अहवाल काँग्रेसच्या हायकमांडला पाठवणार असल्याचे नाना पटोले यावेळी सांगितले.

९६१ कोटी निधीला स्थगिती

नव्या सरकारने मागच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देणे म्हणजे सूड बुद्धीची कृती असल्याची टीका पटोले यांनी केली. वेळ पडल्यास आपण महाविकास आघाडीसोबत बैठक घेऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करू. तसेच राज्यपालांच्याही निदर्शनास ही बाब आणून देऊ. शिवाय तिथेही न्याय न मिळाल्यास आणि वेळ पडली तर न्यायालयात ही जाऊ. कारण अशा प्रकारे निर्णय मागे घेऊन जनतेचे नुकसान होत आहे, असेही पटोले यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com