खडसेंचा गेम ठरला होता पण अजितदादांचा 'मास्टरस्ट्रोक' पडणार फडणवीसांवर भारी

विधान परिषदेच्या निवडणुकीचे मतदान अंतिम टप्प्यात...
Ajit Pawar Latest News | Eknath Khadse Latest News | Devendra Fadnavis Latest News
Ajit Pawar Latest News | Eknath Khadse Latest News | Devendra Fadnavis Latest NewsSarkarnama

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीचे मतदान आता अंतिम टप्प्यात आले आहे. राज्यसभेप्रमाणेच ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीच्या समन्वयाची परिक्षा तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीचा कस लागणार आहे. भाजपकडून राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे यांच्या पराभवासाठी प्रयत्न केले जात असल्याची चर्चा होती. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 'मास्टरस्ट्रोक' भाजपवर भारी पडणार आहे. अजितदादांच्या रणनीतीमुळे खडसे यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे. (MLC Election Latest Marathi News)

राज्यसभा निवडणुकीत फडणवीस यांच्या स्ट्रॅटेजीमुळे भाजपचे तीन उमेदवार निवडून आले. फडणवीसांनी केलेला हा चमत्कार विधान परिषदेच्या निवडणुकीतही दिसेल, असा दावा भाजपच्या सर्वच नेत्यांकडून केला जात आहे. आपले पाचही उमेदवार निवडून आणताना भाजपकडून खडसे यांना लक्ष्य केल्याची चर्चा होती. त्यांच्या पराभवासाठी भाजपचे नेत्यांची खलबतं सुरू असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकत होत्या. खडसे हे भाजपमधून राष्ट्रवादीत आल्यापासून फडणवीसांना लक्ष्य करत आहेत. (Deputy CM Ajit Pawars strategy for Eknath Khadse)

Ajit Pawar Latest News | Eknath Khadse Latest News | Devendra Fadnavis Latest News
पुढच्यावेळी महालक्ष्मी रेसकोर्सवर घोडेबाजार होईल! मतदानाला जाण्याआधी ठाकूरांचं सूचक विधान

यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरेपुर दक्षता घेतल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचा प्रत्येक आमदार अजित पवार यांना भेटल्यानंतरच मतदानाला जात होते. मतदानाची सर्व सूत्र दादांनी हातात घेतली होती. पहिल्या पसंतीचे मत कुणी कुणाला द्यायचे, हे ठरलं होतं. त्यानुसार खडसेंची जागा सुरक्षित करण्यासाठी पक्षाचे दहा मंत्री आणि विश्वासू सहकारी व विश्वासू अपक्ष आमदारांना खडसे यांना पहिल्या पसंतीचे मत देण्यास अजितदादांनी सांगितल्याचे समजते. अजिदादा स्वत: प्रत्येक आमदाराला समजावून सागंत होते.

अजितदादांनी सर्व गणितं जुळवून आणली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता खडसे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तर दुसरे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर यांनाही अपेक्षित मतदान व्हावे, यादृष्टीने काळजी घेतली आहे. इतर आमदार व मित्रपक्षांची सर्व मतं रामराजेंना मिळावीत, अशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे पक्षाच्या दोन्ही उमेदवारांचा पहिल्या पसंतीच्या मतदानाचा कोटा पूर्ण होईल, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांना आहे.

Ajit Pawar Latest News | Eknath Khadse Latest News | Devendra Fadnavis Latest News
नाराज दिलीप मोहिते अजितदादांच्या भेटीला; मतदानाबाबत केले सूचक वक्तव्य!

राष्ट्रवादीकडून 28 चा कोटा?

राष्ट्रवादीने आपले दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा 28 केल्याची चर्चा आहे. विजयासाठी 26 मतांची गरज असली तरी दोघांचा दोन-दोन मतांचा कोटा वाढवण्यात आला आहे. एक-दोन मतं बाद झाली तरी त्यांना धोका होऊ नये, म्हणून ही दक्षता घेतल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीकडे 51 मतं असली तरी मित्रपक्ष व अपक्षांच्या मदतीने राष्ट्रवादीने पाच अधिकची मतं मिळवल्याचीही चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com