राऊतांमुळं महाविकास आघाडी 'बॅकफुट'वर; अपक्ष आमदार देणार भाजपला साथ?

राज्यसभेच्या निवडणुकीत काही अपक्ष आमदारांनी धोका दिल्याचा आरोप राऊतांनी काहींची नावे घेऊन केला होता.
राऊतांमुळं महाविकास आघाडी 'बॅकफुट'वर; अपक्ष आमदार देणार भाजपला साथ?
Shiv Sena MP Sanjay Raut Latest Marathi News Sarkarnama

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अपक्षांवर दगाबाजीचा आरोप केला होता. त्यांनी काही आमदारांची नावे उघडपणे घेतली होती. त्यामुळे अपक्षांमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. आघाडीला मदत करूनही आरोप होत असतील तर विधान परिषदेच्या निवडणुकीत वेगळा विचार करायला हरकत नाही, असं काही अपक्ष आमदार खासगीत बोलत आहेत. त्यामुळे राऊतांमुळे महाविकास आघाडी बॅकफुटवर असल्याची चर्चा आमदारांमध्ये सुरू आहे. (MLC Election 2022 Latest News)

राऊत यांनी बहुजन विकास आघाडीसह अपक्ष आमदार संजय शिंदे, श्यामसुंदर शिंदे आणि देवेंद्र भुयार यांच्यावर थेट आरोप केले आहेत. त्यानंतर भुयार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तक्रार केली. तसेच राऊतांचीही भेट घेतली होती. पण अजूनही काही अपक्ष आमदारांच्या मनात नाराजीची भावना आहे.

Shiv Sena MP Sanjay Raut Latest Marathi News
मोठी घडामोड : ठाकूरांनी अचानक गाठलं न्यूयॉर्क, आघाडीसह भाजपचं टेन्शन वाढलं

आधीच मुख्यमंत्री भेटत नाहीत. त्यात जाहीरपणे संजय राऊत टीका करत असल्याने आपण नाराज झाल्याचे काही अपक्ष आमदारांनी खासगीत बोलताना सांगितले. एवढेच नाही तर मविआला साथ देऊन जर अशा पद्धतीने वागणूक दिली जात असेल तर परिषदेच्या निवडणुकीत वेगळा विचार करायला हरकत नसल्याचे देखील हे आमदार बोलत आहेत. भाजपही या नाराज आमदारांच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीतही अपक्ष आमदार आघाडीला धक्का देणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गुरुवारी आघाडीच्या नेत्यांची वर्षा बंगल्यावर बैठक घेणार आहेत. या बैठकीला आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे. भाजप (BJP) आणि आघाडीमध्ये सहाव्या जागेवरुन लढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत. सहाव्या जागेच्या मतांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न या बैठकीमध्ये केला जाणार, असल्याची माहिती आहे.

Shiv Sena MP Sanjay Raut Latest Marathi News
निवडणूक बिनविरोध न झाल्यास भाजपचं गणित दोनच पक्ष सोडवू शकतात!

या बैठकीसंदर्भात बोलताना काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, विधान परिषद निवडुकीसाठी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. मात्र, आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. मतांची जुळवाजुळव करण्याची गरज नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याच बरोबर ते म्हणाले, भाजप पैसेवाली पार्टी आहे. आम्ही आमदारांना छोट्याशा हॉटेलमध्ये ठेवू.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in