महाविकास आघाडीचा 'करेक्ट कार्यक्रम' होणार? शेलारांसह दरेकर, महाजनांवर मोठी जबाबदारी

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे.
महाविकास आघाडीचा 'करेक्ट कार्यक्रम' होणार? शेलारांसह दरेकर, महाजनांवर मोठी जबाबदारी
Pravin Darekar Latest News, Girish Mahajan Latest Marathi News, Ashish Shelar Marathi NewsSarkarnama

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेतही महाविकास आघाडीला धक्का देण्यासाठी भाजपने (BJP) जय्यत तयारी सुरू केली आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईतून पाठ फिरताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर या निवासस्थानी भाजप नेत्यांची तातडीनं बैठक झाली. या बैठकीत विधान परिषदेची रणनीती ठरवण्यात आल्याचे समजते. (MLC Election Latest Marathi News)

राज्यसभेच्या निवडणुकीची जबाबदारी भाजपने आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या खांद्यावर टाकली होती. तर विधान परिषदेत आघाडी धूळ चारण्यासाठी शेलारांसह गिरीष महाजन (Girish Mahajan) व प्रवीण दरेकरांना (Pravin Darekar) जबाबदारी टाकण्यात आली आहे. तिन्ही नेते फडणवीसांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.

Pravin Darekar Latest News, Girish Mahajan Latest Marathi News, Ashish Shelar Marathi News
जे काही करायचं ते रणांगणात! महाडिकांच्या विजयानंतर सतेज पाटलांचं काय ठरलंय?

राज्यसभा निवडणुकीवेळी निर्णायक ठरलेल्या बहुजन विकास आघाडीच्या तीन मतांसाठी महाजन यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही ठाकूर यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे महाजन याहीवेळी ठाकूरांचं मतं भाजपच्या पारड्यात वळवण्यात यशस्वी ठरणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. देहू येथील शिळा मंदिराचे लोकार्पण, मुंबईमधील राजभवानातील 'क्रांती गाथा' या भूमिगत दालनाचे उद्घाटन, मुंबई समाचार या वृत्तपत्राच्या द्विशताब्दी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यानंतर भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने त्यांनी दिल्लीकडे प्रयाण केले. मोदी यांची पाठ वळताच राज्यातील भाजप नेते अॅक्शन मोडवर आले आहेत.

Pravin Darekar Latest News, Girish Mahajan Latest Marathi News, Ashish Shelar Marathi News
विरारचे ठाकूर कुणाचं गणित बिघडवणार? मित्राची भेट घेत ‘भाईं’नी घातलं साकडं

मंगळवारी बैठक झाल्यानंतर बोलताना आशिष शेलार म्हणाले होते की, निवडणूक झाली नसती बरं झालं असतं, मात्र महाविकास आघाडीच्या अट्टहासापायी निवडणूक लादली आहे. या निवडणुकीची पुनर्बांधणी सुरू असून त्यात १०० टक्के यश मिळवण्यासाठी पहिल्या टप्प्यातील बैठक आहे. आम्ही सगळे सामूहिकतेने जसे राज्यसभा निवडणुकीसाठी रणनिती केली तशीच आता होईल. आमचे सर्व पाचही उमेदवार निवडून येतील. महाविकास आघाडीला हार पचवावी लागेल. सर्व आमदार त्यांचा सततविवेकी बुद्धीने मतदान करतील, असेही शेलार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in