भाजपचे लाड अन् काँग्रेसच्या भाईंमध्ये 'बिग फाईट'; असं असेल विजयाचं गणित...

विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयासाठीचा मतांचा कोटा एकने कमी झाला आहे.
भाजपचे लाड अन् काँग्रेसच्या भाईंमध्ये 'बिग फाईट'; असं असेल विजयाचं गणित...
Bhai Jagtap Latest Marathi News, Prasad Lad Latest Marathi NewsSarkarnama

Vidhan Parishad Elelction 2022

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीतही राज्यसभेप्रमाणेच 'बिग फाईट' होणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड (Prasad Lad) आणि काँग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्यामध्ये ही लढत होणार आहे. आकड्यांचं गणित पाहिलं तर काँग्रेससाठी ही लढत वरवर सोपी वाटत असली तरी भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीत केलेला चमत्कार आघाडीची डोकेदुखी वाढवू शकतो, अशी चर्चा रंगली आहे. (MLC Election Latest Marathi News)

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आता अकरा उमेदवार रिंगणात आहेत. सदाभाऊ खोत यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता भाजपला लाड यांच्या विजयाकडे संपूर्ण लक्ष केंद्रित करता येणार आहे. तर आघाडीला राज्यसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अपक्षांना पुन्हा एकदा गोंजारावे लागणार आहे. यामध्ये प्रामुख्याने काँग्रेसला यावेळी हे शिवधनुष्य उचलावे लागेल.

Bhai Jagtap Latest Marathi News, Prasad Lad Latest Marathi News
रामराजेंकडे 25 हजारांची जीप तर खडसेंकडं वाहनच नाही! राम शिंदे पाच कोटींचे मालक

असं असे निवडणुकीचे गणित?

निवडणुकीत पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी उमेदवाराला 26 मतांची गरज आहे. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख व नवाब मलिक हे तुरुंगात असल्याने सध्यातही हा कोटा एकने कमी झाला आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडीचे 152, भाजपचे 106, अपक्ष तेरा आणि छोट्या पक्षाचे 16 असे 287 आमदार विधानसभेत आहेत. तर मंत्री नबाव मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना मतदानाचा हक्क न्यायालायने नाकारला आहे. त्यामुळे २७ मतांचा कोटा थोडा कमी होण्याची शक्यता आहे.

भाजप व मित्रपक्षांचे 113 आमदार धरल्यास त्यांचे चार उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. तर पाचवे उमेदवार लाड यांना विजयासाठी 17 मतांची गरज भासेल. आघाडीचं गणित एकदम काटावर आहे. शिवसेनेचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. त्यांच्याकडे तीन मतं उतरतात. राष्ट्रवादीचे 51 आमदार आहेत. त्यांना एका मताची गरज आहे. तर काँग्रेसचे 44 आमदार असून दुसऱ्या उमेदवाराला म्हणजे जगताप यांना विजयासाठी आठ मतांची गरज आहे.

Bhai Jagtap Latest Marathi News, Prasad Lad Latest Marathi News
विधान परिषदेच्या निवडणुकीतही घमासान; आघाडीचे सहा तर भाजपचे पाच उमेदवार

राज्यसभा निवडणुकीत भाजपने चमत्कार घडवत तिसरा उमेदवार निवडून आणला. या निवडणुकीत भाजपच्या तिन्ही उमेदवारांना मिळून 123 मतं मिळाली. प्रत्यक्षात भाजपकडे 113 मतं असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीतही एवढी मतं पडल्यास लाड यांना विजयासाठी आणखी केवळ सात मतं लागु शकतात. त्यामुळे भाई आणि लाड यांच्यातील लढतीत मोठी चुरस पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट आहे.

Bhai Jagtap Latest Marathi News, Prasad Lad Latest Marathi News
सदाभाऊ खोत यांची माघार; भाजपचे पाच उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात

भाजपकडून आता प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड हे उमेदवार आहेत. त्यामध्ये लाड हे पाचवे उमेदवार आहेत. तर काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप, राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर व एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमश्या पाडवी हे मैदानात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in