मुख्यमंत्री अलर्टवर; प्रत्येक विधानसभा आमदाराच्या मागावर विधान परिषदेचा एक सदस्य

विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ तरीही घेतली जातेय दक्षता.
CM Uddhav Thackeray Latest Marathi News
CM Uddhav Thackeray Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीचे मतदान आता वेगात सुरू असून त्यात भाजपने आघाडी घेतली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी आणि त्यामागे काँग्रेसच्या आमदारांचा क्रमांक आहे. तर सध्या शिवसेनेच्या आमदारांचेही मतदान सुरू झाले आहे. पण कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सतर्क असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मतदानाला जाणाऱ्या प्रत्येक विधानसभा आमदारासोबत विधान परिषदेच्या एका आमदाराला मतदान केंद्रापर्यंत पाठवले जात आहे. (MLC Election Latest Marathi News)

निवडणुकीत दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेकडे (Shiv Sena) दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी आमदारांचे पुरेसे संख्याबळ आहे. पण भाजपकडून फोडाफोडीची भीती शिवसेनेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून मतदानापुर्वी विशेष काळजी घेतली जात आहे.

CM Uddhav Thackeray Latest Marathi News
आशुतोष काळेंसह राष्ट्रवादीच्या 45 आमदारांचं मतदान; मोहिते, बनसोडेंसाठी अजूनही वेटिंग

विधान भवनात मुख्यमंत्री कार्यालयात ठाकरे यांनी आमदारांशी संवाद साधल्याचे समजते. त्यानंतर मतदानासाठी पाच आमदारांचा एक गट करण्यात आला आहे. एक विधान परिषद आमदारासोबत एक विधानसभा सदस्य मतदानासाठी पाठवले जात आहेत. मतदान सुरू असलेल्या हॉलपर्यंत विधानसभा आमदारासोबत विधान परिषदेचे आमदार जात आहे.

अनिल बोंडे यांचा शिवसेनेवर बॉम्ब

निवडणुकीत महाविकास आघाडी विरूध्द भाजप अशी थेट लढत असली तरी प्रामुख्याने प्रसाद लाड आणि भाई जगताप यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. पण भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी सूचक ट्विट करत निवडणुकीचा निकाल सांगून टाकला आहे. मतदानाला सुरूवात होण्याच्या काही मिनिटंआधी बोंडे यांनी केलेल्या या ट्विटचे अनेक राजकीय अर्थ आहेत. 'काळ आला होता भाऊ किंवा भाईवर, पण मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा,' असं बोंडे यांनी म्हटलं आहे. त्यांचा रोख थेट शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्याचे दिसते.

CM Uddhav Thackeray Latest Marathi News
'समाजवादी'नंही पत्ते खुले केले; भाई जगतापांना करावी लागणार धावाधाव

काँग्रेसच्या भाई जगतापांना आठ मतांसाठी झगडावे लागणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रसचे उमेदवार एकनाथ खडसे यांनाही एक-दोन मतांची बेगमी करावी लागणार आहे. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात, एवढी मतं त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे शिवसेनेची अतिरिक्त मतं भाईंना मिळण्याची शक्यता आहे.

पण बोंडे यांच्या ट्विटमुळे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी मिशीवाला मावळा म्हणजे शिवसेनेचे उमेदवार आमश्या पाडवी यांचा बळी दिला जाणार असल्याचे बोंडे यांना सुचित करायचे आहे. पाडवी यांना धोक्यात टाकून शिवसेनेकडून काँग्रेस व राष्ट्रवादीला मदत केली जाऊ शकते, असंही त्यांना म्हणायचे आहे का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com