मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार! अनिल बोंडेंनी टाकला बॉम्ब

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप विरूध्द महाविकास आघाडीमध्ये चुरस आहे.
मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार! अनिल बोंडेंनी टाकला बॉम्ब
Bjp Leader Anil Bonde-Cm Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरूध्द भाजप अशी थेट लढत असली तरी प्रामुख्याने प्रसाद लाड आणि भाई जगताप यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. पण भाजपचे नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी सूचक ट्विट करत निवडणुकीचा निकाल सांगून टाकला आहे. (MLC Election 2022 Latest Marathi News)

मतदानाला सुरूवात होण्याच्या काही मिनिटंआधी बोंडे यांनी केलेल्या या ट्विटचे अनेक राजकीय अर्थ आहेत. 'काळ आला होता भाऊ किंवा भाईवर, पण मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा,' असं बोंडे यांनी म्हटलं आहे. त्यांचा रोख थेट शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे असल्याचे दिसते.

Bjp Leader Anil Bonde-Cm Uddhav Thackeray
'समाजवादी'नंही पत्ते खुले केले; भाई जगतापांना करावी लागणार धावाधाव

काँग्रेसच्या भाई जगतापांना आठ मतांसाठी झगडावे लागणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रसचे उमेदवार एकनाथ खडसे यांनाही एक-दोन मतांची बेगमी करावी लागणार आहे. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात, एवढी मतं त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे शिवसेनेची अतिरिक्त मतं भाईंना मिळण्याची शक्यता आहे.

पण बोंडे यांच्या ट्विटमुळे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी मिशीवाला मावळा म्हणजे शिवसेनेचे उमेदवार आमश्या पाडवी यांचा बळी दिला जाणार असल्याचे बोंडे यांना सुचित करायचे आहे. पाडवी यांना धोक्यात टाकून शिवसेनेकडून काँग्रेस व राष्ट्रवादीला मदत केली जाऊ शकते, असंही त्यांना म्हणायचे आहे का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव पक्षाच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना कोणताही धोका पत्करणार नाही, ही शक्यता आहे. त्यामुळे अतिरिक्त मतं काँग्रेसला मिळणार का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहेत. त्यातच बोंडे यांनी केलेल्या सुचक ट्विटमुळे राजकीय चर्चांना ऊत आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in