Ncp News : राष्ट्रवादीचं ठरलं : आमदार शेळके अन् तुपेंवर पुण्याची जबाबदारी; मुंडे, खडसे, तटकरे आणि देशमुखांकडे 'हे' विभाग

Sharad Pawar News : बूथ कमिट्या बळकट करण्यासाठी पक्षाच्या काही नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.
Sunil Shelke, Chetan Tupe
Sunil Shelke, Chetan TupeSarkarnama

Ncp Meeting News : राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी पक्षांतर्गत राज्य निवडणूक अधिकारी म्हणून जयप्रकाश दांडेगावकर तसेच मुंबई विभागीय निवडणूक अधिकारी म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी निवड करण्यात आली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी माध्यमांशी संवाद साधून पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीसंदर्भात माहिती दिली.

बैठकीत पक्षसंघटनेबाबत चर्चा करण्यात आली. तसेच बूथ कमिट्या बळकट करण्यासाठी पक्षाच्या काही नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. ज्यामध्ये विदर्भ, नागपूर विभाग माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) व मनोहर चंद्रिकापुरे, विदर्भ, अमरावती विभाग माजी मंत्री राजेंद्र शिंगणे व आमदार अमोल मिटकरी, कोकण विभाग माजी मंत्री जितेंद्र आव्हाड व सुनिल भुसारा.

Sunil Shelke, Chetan Tupe
Jayant Patil News : राष्ट्रवादी काँग्रेसचे 'मिशन' अहमदनगर; जयंत पाटील म्हणाले...

तर मराठवाडा विभाग माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde), आमदार विक्रम काळे आणि सतिश चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र विभाग आमदार शशिकांत शिंदे व अरुण लाड, पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे) आमदार सुनिल शेळके व चेतन तुपे, पश्चिम महाराष्ट्र विभाग (सोलापूर) आमदार अशोक पवार व चेतन तुपे, खान्देश विभाग अनिल पाटील व ज्येष्ट नेते एकनाथ खडसे, कोकण विभाग आमदार अनिकेत तटकरे व शेखर निकम यांच्यावर जबाबदारी सोपावण्यात आली आहे.

Sunil Shelke, Chetan Tupe
Nagpur BJP News : भाजपला भाकरी फिरवावी लागणार, पण नेत्यांची नाही; तर…

या वेळी बूथ किती कालमर्यादेत पूर्ण करावे याचे मार्गदर्शन पक्षश्रेष्ठींकडून करण्यात आले. या बैठकीत माजी मंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचा मुद्दा उपस्थित केला. परमबीर सिंह यांचे निलंबन रद्द करण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तीव्र आक्षेप आहे. या अधिकाऱ्याने अनिल देशमुख यांच्यावर खोटे ऐकीव आरोप लावले ज्यातून राज्य सरकारची बदनामी करण्यात झाली. या सर्व मुद्द्यांवर पक्षाचे नेते, आमदार आवाज उठवणार असल्याचे महेश तपासे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com