बंडखोर आमदार अ्न शिवसेनेतील अंतर वाढले; शिंदे समर्थकांना थेट आसामला नेणार

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात भूकंप
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबच्या सर्व बंडखोर आमदारांचे आता सुरतवरुन एअरलिफ्ट करण्यात येत असून त्यांना आता गुवाहाटीला नेण्यात येत असल्याची माहिती आहे. सुरतच्या हॉटेलमधून या आमदारांना आता गुजरात पासिंगच्या गाड्यांमधून विमानतळाकडे नेण्यात येत आहे. (Eknath Shinde Latest Marathi News)

एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 35 आमदार असल्याचे सांगण्यात येत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच शिंदे नॅाट रिचेबल झाले होते. त्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला. शिवसेना (Shivsena) तसेच महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक सुरतला गेले होते. त्यांनी शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे गुजरामतमध्ये आमदारांशी शिवसेना संपर्क करु शकते. त्यामुळेच या आमदारांना आता आसाममध्ये गुवाहाटीला नेण्यात येत आहे.

Eknath Shinde
बंडखोर एकनाथ शिंदेंमार्फत अमित शहांचा ठाकरेंना `मेसेज` : पंगा घेऊ नका...

शिवसेनेने महाविकास आघाडीसोबतच्या सरकारमधून बाहेर पडावे आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात फोनवरुन चर्चाही झाल्याची माहिती समोर येत आहे. हे सर्व आमदार आता गुवाहाटीला रात्री एक वाजेपर्यंत पोहोचणार आहेत.

शिंदे समर्थक आमदारांची यादी ३५ च्या पुढे जाण्याची चिन्हे आहेत. पुढच्या काही तासांत शिवसेना आणि त्यांच्या मित्रपक्षांमधील आमदार फोडाफोडीच्या सत्राला प्रचंड वेग येण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या बंडानंतर ठाकरे यांचा मेसेज घेऊन नार्वेकरांनी सुरतमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत बरेच काही दडल्याचा संशय भाजप नेत्यांना आला आणि नार्वेकरांची पाठ फिरताच भाजपच्या एका नेत्याने शिंदेंशी चर्चा केली.

Eknath Shinde
शिंदेच्या तावडीतून सुटलेले आमदार कैलास पाटील ठाकरेंसमोर धाय मोकलून रडले...

या दोघांत बऱ्याच विषयांवर बोलणे, त्यात ठाकरेंची भूमिकाही जाणुन घेण्यात आली. नार्वेकरांच्या मध्यस्थीनंतरही ठाकरे काही माघार घेण्याची शक्यता धूसर असल्याचे शिंदे यांनी भाजप नेत्याच्या कानावर घातले. त्यावर संतप्त झालेल्या भाजपने थेट 'उद्धव ठाकरे उगाचच दुश्मनी घेत आहेत. ती घेऊ नये, हे तुम्ही चांगले पटवून द्या' असे भाजप नेत्याने शिंदेंना सांगितल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com