MLA Yogesh Kadam Accident : अपघात नव्हे, घातपात ? ; चौकशीसाठी आमदार कदमांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

MLA Yogesh Kadam Accident : या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी योगेश कदम यांनी केली आहे.
MLA Yogesh Kadam Accident
MLA Yogesh Kadam Accident sarkarnama

MLA Yogesh Kadam Accident : शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश कदम (Yogesh Kadam Accident)यांच्या गाडीला काल (शुक्रवारी) रात्री अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या चालकाला आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीसाला दुखापत झाली आहे.

योगेश जाधव यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या तक्रारीमध्ये घातपाताची शंका व्यक्त केली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी योगेश कदम यांनी केली आहे. अपघातानंतर कदम माध्यमांशी बोलत होते.

MLA Yogesh Kadam Accident
Nawab Malik News : मलिकांना दिलासा नाहीच ! ; न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला..

"माझ्या गाडीच्या मागे आमची दुसरी गाडी होती, तर पुढे पोलिसांची गाडी गाडी होती, असे असतानाही माझ्या गाडीला हा डम्पर धडकला आहे. या अपघाताचे स्वरुप लक्षात घेता, माझा घातपात करण्याची शंका निर्माण होते. याबाबत मी पोलिसांकडे सविस्तर तक्रार दिली आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या अपघाताची चौकशी करावी, अशी मागणी मी केली आहे, " असे योगेश कदम यांनी सांगितले.

रात्री सव्वादहाच्या सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे हा अपघात झाला आहे. त्यांच्या कारला डम्परने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहिती आहे. ते खेडहून मुंबई येत होते. "आई जबदंबेच्या कृपेने सुखरुप आहे," अशी भावना योगेश कदम यांनी व्यक्त केली आहे.

MLA Yogesh Kadam Accident
Delhi Mayor Election : महापौर निवडणुकीपूर्वी राडा ; आप-भाजपचे नगरसेवक भिडले,खुर्च्या फेकल्या..

डम्परने योगेश कदम यांच्या कारला (Yogesh Kadam Car Accident) जोरदार धडक दिली आहे. या धडकेत गाडीच्या मागील बाजूचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे. यात योगेश कदम सुखरुप आहेत. मात्र त्यांच्या चालकाला आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीसाला दुखापत झाली आहे.

काही दिवसापू्र्वी आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाला होता. त्यांना पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल (शुक्रवारी) त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता, पण पुन्हा त्यांची तब्येत खालवल्याने गोरे यांना आता पुण्यातील रुबी हॉलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com