
पुणे : शिंदे गटातील आमदार उदय सामंत (uday samant)यांच्या गाडीवर काल पुण्यात शिवसैनिकांनी (shivsena) हल्ला केला. या हल्ल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी पुणे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे (sanjay more) यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानंतर अवघ्या काही तासांतच पुणे पोलिसांनी हल्लेखोरांची धरपकड केली आहे. (shivsena latest news)
उदय सामंतांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला असला तरी शिवसैनिकांचा आमदार तानाजी सावंत यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा कट होता. मात्र, तानाजी सावंत यांची गाडी समजून त्यांनी उदय सामंतांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. शिवसैनिक तानाजी सावंत यांना शोधत होते, मात्र ते सापडले नाहीत.
काल (मंगळवारी) याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना तानाजी सावंत यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. तानाजी सावतं म्हणाले, "या बाबत आपण ४ ते ८ दिवसात प्रतिक्रिया देऊ. आमचे कार्यकर्त्यच याबाबत रिअॅक्शन देतील," असा सूचक इशारा तानाजी सावंत यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला. "जशास तसे उत्तर देण्यात येईल," असाच अर्थ तानाजी सावंत यांच्या विधानातून निघतो.
"आम्हाला वाटलं तानाजी सावंत आहेत, म्हणून आम्ही ही गाडी अडवली, पण ती उदय सामंत यांची गाडी होती. तानाजी सावंत हे गद्दार असून ते पळून गेले आहेत. पुण्यात शिंदे गटातील आमदार दिसले तर त्यांना मारहाण करु," असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. तानाजी सावंत यांच्या विधानानंतर आता शिवसेना आणि शिंदे गट एकमेंकासमोर उभे ठाकणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काल शिवसैनिकांनी सामंत यांच्या कारची मागची काच फोडली. यात हल्ल्यामुळे कारमधील एकजण जखमी झाला आहे. याप्रकरणी उदय सामंत यांनी तत्काळ पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. काही हल्लेखोरांचे फोटोही यावेळी दिले. दरम्यान, याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई व्हावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यामुळे पोलिसांनीही आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि पाच जणांना अटक केली. यामध्ये शिवसंवाद सभेचे मुख्य आयोजक संभाजी थोरवे, राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रुपेश पवार आणि पुण्याचे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांना अटक करण्यात आली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.